शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शाहूपुरीत ‘मसाज’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय, अड्डामालकिणीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 16:41 IST

‘मसाज’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या शाहूपुरी, पाच बंगला येथील मंजुळा इमारतीमधील ‘गुलमोहर फिटनेस सेंटर’ या मसाज सेंटरवर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी (दि. १६) दुपारी छापा टाकला. या सेंटरच्या महिला मालकिणीला अटक केली. संशयित प्रिया विनायक यादव (वय २७, रा. पुईखडी, शिव पार्वती हौसिंग सोसायटी, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. तिच्या ताब्यातून स्थानिक पीडित दोन महिलांची सुटका केली.

ठळक मुद्देशाहूपुरीत ‘मसाज’च्या नावाखाली वेश्या व्यवसायअड्डामालकिणीला अटक स्थानिक पीडित दोन महिलांची सुटका

कोल्हापूर : ‘मसाज’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या शाहूपुरी, पाच बंगला येथील मंजुळा इमारतीमधील ‘गुलमोहर फिटनेस सेंटर’ या मसाज सेंटरवर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी (दि. १६) दुपारी छापा टाकला. या सेंटरच्या महिला मालकिणीला अटक केली. संशयित प्रिया विनायक यादव (वय २७, रा. पुईखडी, शिव पार्वती हौसिंग सोसायटी, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. तिच्या ताब्यातून स्थानिक पीडित दोन महिलांची सुटका केली.याबाबत पोलिसांनी सांगितले, शाहूपुरी, पाच बंगला-बागल चौक परिसरातील इंडिया पार्क, मंजुळा इमारतीमधील ‘गुलमोहर फिटनेस सेंटर’ या मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडील वाचक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांना मिळाली होती.

त्यानुसार ते शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास करवीर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक आरती नांद्रेकर यांच्यासह सहकाऱ्यांना घेऊन कारवाईसाठी रवाना झाले. बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री करून घेतली. त्यानंतर छापा टाकला असता कुंटणखाना चालविला जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी अड्डा मालकीण प्रिया यादवसह स्थानिक दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची कबुली दिली.

आरती नांद्रेकर यांनी स्वत: फिर्याद देऊन अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलमानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पीडित महिला ह्या स्थानिक असून, त्यांची परिस्थिती गरिबीची आहे. संशयित प्रिया यादव ही मसाज सेंटरच्या नावाखाली या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असे.दुसऱ्यांदा कारवाईयाच मसाज सेंटरमध्ये दि. २६ मार्च २०१७ ला तत्कालीन शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी छापा टाकून कारवाई केली होती. यावेळी अड्डा मालकीण अनुराधा बाळासाहेब देशमुख (वय ३०, रा. कणेरेवाडी, ता. करवीर), शिल्पा अमितकुमार देशमुख (३१, रा. गुलमोहर कॉलनी, आर. के. नगर) या दोघींसह एका पीडित तरुणीला ताब्यात घेतले होते. कारवाईनंतर दोन महिने मसाज सेंटर बंद राहिले. त्यानंतर प्रिया यादव हिने सुरू केले. या सेंटरचा शाहूपुरी पोलिसांना महिना हप्ता जात असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हाPoliceपोलिस