शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

कोल्हापूर महापालिका :महास्वच्छता मोहिमेस नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 2:33 PM

कोल्हापूर शहरामध्ये  विविध संस्थांच्या माध्यमातून मोहिमेच्या महास्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ८ डंपर कचरा जमा करण्यात आला. महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिका :महास्वच्छता मोहिमेस नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद८ डंपर कचरा जमा; लक्ष्मीपुरी, ताराबाई पार्क, पाटोळेवाडी, कळंबा परिसरात मोहीम

कोल्हापूर : शहरामध्ये  विविध संस्थांच्या माध्यमातून मोहिमेच्या महास्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ८ डंपर कचरा जमा करण्यात आला. महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले.लक्ष्मीपुरीतील विल्सन ब्रिजनजीक अश्विनी हॉस्पिटलच्या पिछाडीस असलेल्या जयंती ओढ्यामध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. संप आणि पंप हाऊस येथे जयंती नाल्यातून वाहून आलेला थर्माकॉल व प्लास्टिक कचरा वाहून काढला.नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी भागातील नागरिकांसह ताराबाई पार्क येथे विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. विभागीय कार्यालय क्र. ४ च्यावतीने पाटोळेवाडी, काटेमळा, मेनन बंगला परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. रंकाळा तलाव जुना वाशी नाका परिसरातील शाहू उद्यानात वृक्षारोपण केले. कोल्हापूर केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने सर्वांना हँडग्लोज पुरविले.यावेळी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, तौफिक मुल्लाणी, नगरसेविका कविता माने, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहा.आयुक्त संजय सरनाईक, दिलीप देसाई, दिलीप पोवार, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, क्रिडाई अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, विक्रांत जाधव, पदाधिकारी, कोल्हापूर केमिस्ट अ‍ॅड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे, स्वरा फौंडेशनचे कार्यकर्ते, महापालिकेचे कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.आयुक्त संतापले; स्क्रॅप १५ दिवसांत हटविण्याच्या सूचनालक्ष्मीपुरी व्हीनस कॉर्नर चौकातील गाडी अड्डा येथे नियोजित संकुल व वाहनतळ असल्याने येथे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी भेट दिली. परिसरात स्क्रॅपच्या गाड्या व स्क्रॅपचे मटेरियल पुन्हा अस्ताव्यस्त पडल्याने निदर्शनास आले, त्यावेळी संतप्त आयुक्तांनी व्यापाऱ्यांना पंधरा दिवसांत या जागेतील कचरा व गाड्या हटविण्याबाबत सूचना दिल्या. महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेतच व्यापाऱ्यांनी व्यवसाय करावा अन्यथा कारवाई करावी लागेल, असा दमच दिला.पार्किंग झोन जाहीरशहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले यांना दि. १ जुलै २०१९ पूर्वी गाडी अड्ड्याची जागा रिकामी करून तेथे वाहन पार्किंग सुरू करण्याचे आदेश दिले. लक्ष्मीपुरीतील अश्विनी हॉस्पिटल शेजारील महापालिकेच्या खुल्या जागेत पार्किंग झोन जाहीर करून तेथे वाहने पार्किंग सुरू करण्याचे आदेश उपशहर रचनाकार नारायण भोसले, इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले यांना दिले.या परिसरात राबविली मोहीमविल्सन ब्रिज (लक्ष्मीपुरी), हनुमान नगर, अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल ते जवाहरनगर, कळंबा सांडवा, अहिल्याबाई होळकर डिन्स्पेन्सरी, गवत मंडई, हॉकी स्टेडियम, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मागील बाजूस ते लक्ष्मीपुरी परिसरातील स्वच्छता, सिद्धिविनायक गणपती मंदिर पुलाची खालची बाजू, लक्ष्मीपुरी ते आयर्विन ब्रिज, टायटन शोरूमलगत दफनभूमी, आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस, सुतारवाडा आतील पाईप ठिकाणी, पंप हाऊस ते सिद्धार्थनगर या जयंती नाला परिसर व रंकाळा तलाव पूर्व व पश्चिम बाजूची स्वच्छता केली. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर