शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांचा ३० ऑक्टोबरपासून बेमुदत संप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 18:19 IST

कोल्हापूर : सर्व कायम कर्मचाऱ्यांना एक तारखेला पगारासह निवृत्तिवेतन मिळाले पाहिजे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना तातडीने कायम करावे, दरम्यानच्या काळात त्यांना ...

कोल्हापूर : सर्व कायम कर्मचाऱ्यांना एक तारखेला पगारासह निवृत्तिवेतन मिळाले पाहिजे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना तातडीने कायम करावे, दरम्यानच्या काळात त्यांना २६ दिवस काम देण्यात यावे, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तत्काळ पदोन्नती देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी येत्या दि. ३० ऑक्टोबरपासून बेमुदत संप जाणार आहेत. त्याची घोषणा गुरुवारी कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांनी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनानंतर केली.महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाबरोबर चर्चा सुरू आहे; परंतु त्यातून काहीच मार्ग निघत नसल्याने तसेच प्रशासनातील अधिकारी निर्णय घेण्याच्या दृष्टीने कोणतीच प्रक्रिया राबवीत नसल्याने गुरुवारी कर्मचारी संघातर्फे मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने आयोजित केली होती.सायंकाळी पावणेसहा वाजता रोजंदारी कर्मचाऱ्यांसह कायम कर्मचारी महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर जमले आणि त्यांनी निदर्शने सुरू केली. एक तारखेला पगार मिळालाच पाहिजे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक तारखेला निवृत्तिवेतन मिळालेच पाहिजे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना २६ दिवस काम मिळालेच पाहिजे, चतुर्थ तसेच तृतीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती झालीच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाही, तर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी निदर्शनाचे रूपांतर छोट्या सभेत झाले.

यावेळी कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे, काका चरापले, निशिकांत सरनाईक यांची भाषणे झाली. अजित तिवले यांनी आभार मानले. यावेळी अध्यक्ष संजय भोसले यांनी, येत्या २९ ऑक्टोबरपर्यंत जर कर्मचारी संघाने केलेल्या मागण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर दि. ३० ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला.

रोजंदारी कर्मचाऱ्यांना २६ दिवस काम

दरम्यान, प्रशासनाने गुरुवारी सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना २६ दिवस काम देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असताना २६ ऐवजी १८ दिवस काम देण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द करून उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी सुधारित आदेश काढून पूर्ववत २६ दिवस काम देण्याचे परिपत्रक विभागप्रमुखांना दिले.जे रोजंदारी कर्मचारी कार्यालयीन स्वरूपाच्या कामासाठी नियुक्त केले आहेत, त्यांना २२ दिवस काम द्यावे. ते कर्मचाऱ्याची २२ दिवसांपेक्षा जास्त काम करतील अशा कर्मचाऱ्यांच्या वाढीव दिवसाचे कामकाज एकूण २६ दिवसांच्या मर्यादेत खातेप्रमुखांनी प्रमाणित करून देण्याचा आहे. तसेच वर्ग-३ साठी वयोमर्यादा ५८ वर्षे व वर्ग-४ साठी वयोमर्यादा ६० वर्षे असल्याने त्यापेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना काम देणे तत्काळ थांबवावे, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर