शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
2
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
3
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
4
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
5
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
7
"वक्तव्य होत असतात, राम सर्वांचे आणि राष्ट्र..."; RSS नेते इंद्रेश कुमार यांच्या विधानावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया
8
ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?
9
अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचला; पण स्टार स्पिनर T20 World Cup मधून बाहेर झाला
10
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
11
फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 
12
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जूनला, कामकाज समितीच्या बैठकीला अजित पवार गटाची दांडी
13
सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली...
14
WHAT A MATCH! आफ्रिकेला आशियाई संघानं घाम फोडला; मोठा उलटफेर होण्यासाठी १ धाव कमी पडली
15
न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले
16
कॅलिफोर्नियातील PNG ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा, २० दरोडेखोर आले, दोन मिनिटांत सराफा दुकान साफ केले
17
आजचे राशीभविष्य - शनिवार १५ जून २०२४; यश, कीर्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होईल, आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल
18
40 ALL OUT! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नवख्या संघाला लोळवलं
19
YO-YO Test मध्ये पास न होणाऱ्यांना संघातून वगळणं चुकीचंच; गंभीरचं रोखठोक मत
20
भाजप वादग्रस्त विधेयके ठेवू शकते थंडबस्त्यात, संसद अधिवेशनात 'सहमती' हा नवीन मंत्र

कोल्हापूर महापालिकेत सात कोटींचा तसलमात घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 11:43 AM

कोल्हापूर : महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने तसलमात घोटाळा केला असून याप्रकरणी आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट करावी तसेच सर्व ...

ठळक मुद्देहिंदू विधीज्ञ परिषदेचा आरोप : कारवाई करा अन्यथा फौजदारीचा इशारा

कोल्हापूर : महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने तसलमात घोटाळा केला असून याप्रकरणी आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट करावी तसेच सर्व संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात फौजदारी दाखल करू, असा इशारा बुधवारी हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी अचानक उद्भवणाऱ्या खर्चासाठी आगाऊ रकमा तसलमात म्हणून घेतल्या आहेत. रकमेचा विनीयोग काय झाला, त्याचा तपशील आणि पुरावे उदा. देयके जमा करणे, उरलेली रक्कम परत करणे बंधनकारक असते. आधीच्या तसलमातीचा हिशेब जमा केल्याशिवाय नवीन आगाऊ रक्कम उचलता येत नाही, असा कायदा असूनही कित्येक वर्षे ना हिशेब दिला आहे, ना रकमा जमा केलेल्या आहेत. या रकमा वसूलीसाठी २०१५ मध्ये विभागप्रमुखांना पाठपुराव्याची पत्रे दिली होती परंतू त्यानंतर पुढे कांहीच झालेले नाही. यासंदर्भात दि. ३१ मार्च २०१८ या दिवशी ही रक्कम सात कोटी एक लाख ५४ हजार ८४४ रुपये इतकी असल्याचे उघडकीस आले आहे.

ज्यांनी या तसलमात घेतली होती त्यांच्या पगारातून या रक्कमा वसूल करणे आवश्यक होते; पण असे काही न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. म्हणजेच यात गैरव्यवहार झाला असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करावी, त्यांच्याकडून व्याजासह वसुली करावी, अशी मागणी करतानाच जर कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयामार्फत फौजदारी दाखल करू, असा इशारा इचलकरंजीकर यांनी दिला. यावेळी परिषदेचे अ‍ॅड. समीर पटवर्धन, हिंदू जनजागृतीचे किरण दुसे आणि बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.घोटाळ्याची काही उदाहरणे अशी -- वैद्यकीय तसलमात एक लाख ३० हजार व एक लाख ५० हजार आहेत.- रंकाळा जलपर्णी काढण्यासाठी आठ लाख १७ हजार ७७० रुपये तसलमात उचल.- के.एम.टी.साठी एक कोटी १५ लाख रुपयांचा खर्च- न्यायालयीन कामकाजासाठी ६५ हजार रुपयांचा खर्च विनापुरावा.- पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी १० महिन्यांत १ कोटी ८५ हजार रुपयांवर खर्च.- पंढरपूर वारीसाठी माधवी मसूरकर यांना २५ हजार रुपये तर फुटबॉल स्पर्धेसाठी तानाजी मोरे यांस ५० हजार रुपये दिले.- २०१८ मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनासाठी ३५ हजार रुपयांची तसलमात घेतली- मंत्रालयातील सचिवांच्या दौºयासाठी १० हजार रुपयांचा खर्च- राष्ट्रीय दिनादिवशी जिलेबी वाटपासाठी साडेसात हजार रुपये. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर