शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेचे टेंडर अन् गुवाहाटीची चर्चा; महापालिकेने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 13:57 IST

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीत बसवण्यात येणारी गॅस दाहिनीची किंमत एक कोटीवर असल्याने महापालिकेने नियमानुसार देशातील विविध राज्यात इंग्रजी दैनिकांत ...

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीत बसवण्यात येणारी गॅस दाहिनीची किंमत एक कोटीवर असल्याने महापालिकेने नियमानुसार देशातील विविध राज्यात इंग्रजी दैनिकांत जाहिरात प्रसिद्ध केली आहे; मात्र राज्यातील सत्ताबदलावेळी आमदार गुवाहाटीला गेल्याचा संदर्भ असल्याने कोल्हापूर महापालिकेस निविदा प्रसिद्ध करण्यास गुवाहाटीचा पेपर बरा सापडला. एवढ्या लांबच्या पेपरमध्ये जाहिरात देण्याचं प्रयोजन काय ? काय झाडी काय डोंगार काय हाटील...सगळंच एकदम भारी असा मिश्किल मेसेज समाजमाध्यमातून फिरत आहे. याची दखल घेऊन महापालिकेने हा मेसेज चुकीचा असून नियमानुसार देश पातळीवर जाहिरात प्रसिद्ध केल्याचा खुलासा केला आहे.शासनाच्या स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पंचगंगा स्मशानभूमीत १ कोटी ५८ लाख ७२३ रूपयांची गॅस दाहिनी बसवणार आहे. याची किंमत एक कोटीवर असल्याने महापालिकेने राष्ट्रीय पातळीवर टेंडरची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरात गुवाहाटीसह दिल्ली, कोलकात्ता, हैदराबाद, चेन्नई, गुजरात, महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आहे. मात्र सोशल मीडियात गुवाहाटीतील जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा संदर्भ देऊन काय झाडी काय डोंगार काय हाटील.. असे म्हणत खिल्ली उडवली आहे. समाज माध्यमात व्हायरल झाल्याने याचा महापालिकेस खुलासा करावा लागला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल