शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!
2
'बह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
3
सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष
4
राज्यात आता रोबोट करणार मॅनहोलची सफाई, २७ महापालिकांसाठी १०० रोबोट
5
"मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?
6
जगातील निम्मे सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे
7
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला मिळतील १६,६५० रुपये
8
Video - धक्कादायक! चालता बोलता 'तो' खाली कोसळला, सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यूचा संशय
9
टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण
10
जगभर : युक्रेनच्या स्त्रिया शिवताहेत ‘किकिमोरा वॉरसूट्स’, युद्धातील संघर्ष कथा
11
IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी
12
बहुतेक लोकांना 'या' लोनबद्दल माहितीच नाही, Personal Loan पेक्षाही स्वस्त आणि EMI चं टेन्शनही नाही
13
बँड, बाजा आणि जेल! लग्न होताच अटक; ४ गुन्हेगारांना पकडण्यासाठी १५३ पोलिसांचा फौजफाटा
14
लेख: ‘रोजगार हमी’चा खर्च तिप्पट; मजुरांना पैसे मिळाले का?
15
भल्यामोठ्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
16
"मधुबाला शेवटी एकटी पडली, किशोर कुमार यांनी दुर्लक्ष केलं", बहीण मधुर भूषण यांचा खुलासा
17
बाबा रामदेव यांच्या पतंजलीची अदार पूनावाला यांच्या कंपनीसोबत मोठी डिल; नवीन क्षेत्रात उडी
18
रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..."
19
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएन्सरचा दावा; हॉटेलने केली अशी कमेंट
20
"तिच्या अंगाची दुर्गंधी येते"; प्रतिस्पर्ध्याला वापरण्यास सांगितले डीओ; टेनिसमधला अजब प्रकार

कोल्हापूर मनपाने १० कोटी भरावे, मगच पाणीपट्टीत सूट; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बजावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:31 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेकडे थकीत असलेल्या पाणीपट्टीच्या एकूण रकमेपैकी १० कोटींची रक्कम दोन टप्प्यात तातडीने भरावी. ही रक्कम भरल्यानंतर ...

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेकडे थकीत असलेल्या पाणीपट्टीच्या एकूण रकमेपैकी १० कोटींची रक्कम दोन टप्प्यात तातडीने भरावी. ही रक्कम भरल्यानंतर उर्वरित थकीत रकमेत सूट देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत बजावले.महानगरपालिकेच्या थकीत पाणीपट्टीसंदर्भात जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार अमल महाडिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अ. ह. धुमाळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाल्या.मंत्री विखे पाटील म्हणाले, महानगरपालिकेकडे पाणीपट्टीपोटी सुमारे ६२ कोटींची रक्कम थकीत आहे. यापैकी आतापर्यंत ८ कोटी महापालिकेने भरले आहेत. उर्वरित रकमेतील १० कोटींची रक्कम दोन हप्प्यात भरा. त्यानंतर यासंदर्भात महापालिका व जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उर्वरित रकमेसंदर्भात मार्ग काढावा. उर्वरित थकीत पाणीपट्टींमध्ये सवलत देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल.महानगरपालिकेने यावर्षी ८ कोटी पाणी पट्टी भरली असल्याबाबतची माहिती महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिली. सन २०२५ ते २०३१ पर्यंत पाणी उपलब्ध होण्यासंदर्भात महानगरपालिकेने पाणी करार केला आहे. यावर्षीपासून प्रतिमहा पाणीपट्टी भरण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील