शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
2
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
3
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
4
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
5
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
6
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
7
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
8
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
9
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
10
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
11
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
12
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
13
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
14
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
15
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
16
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
17
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
18
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
19
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
20
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
Daily Top 2Weekly Top 5

आयोगाला जाग; मतदार याद्या दुरुस्तीस मुदतवाढ, कोल्हापूर महापालिकेने केली बीएलओ, पर्यवेक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:46 IST

कर्मचारी ऑनफिल्ड लागले कामाला 

कोल्हापूर : शहरातील २० प्रभागांच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतील मोठ्या प्रमाणात चुका निदर्शनास आल्यामुळे महापालिका प्रशासन हादरून गेले असून जादा कर्मचारी नियुक्तीबरोबरच आता बीएलओ, पर्यवेक्षक यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे सर्व कर्मचारी मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी ‘ऑन फिल्ड’ कामाला लागले आहेत. दरम्यान, यादीतील घोळाची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगानेही बुधवारी हरकती, सूचना दाखल करून घेण्याची तसेच अंतिम याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत सहा दिवसांनी वाढविली आहे.याआधीच्या कार्यक्रमानुसार शुक्रवारपर्यंत हरकती, सूचना दाखल करण्याची मुदत होती, ती आता वाढवून दि. ३ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच हरकतीवर सुनावणी घेऊन अंतिम मतदार याद्या दि. ५ डिसेंबरऐवजी १० डिसेंबरला प्रसिद्ध करायच्या आहेत.प्रारूप मतदार याद्यातील गंभीर चुका लक्षात आल्यानंतर राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, त्यामुळे पालिका प्रशासनदेखील गडबडून गेले. शहरातील घराघरांपर्यंत पोहोचणारे घरफाळा, पाणीपुरवठा, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मतदार याद्यांच्या दुरुस्तीच्या कामात समाविष्ट करून घेतले. त्यांना मतदार याद्या दुरुस्त कशा करायच्या याचे प्रशिक्षण दिले. आता सगळे कर्मचारी प्रत्यक्ष प्रभागात जाऊन हरकतींची छाननी करू लागले आहेत.मतदार याद्यांवर दि.२५ नोव्हेंबरपर्यंत एकूण १४३ हरकती घेण्यात आल्या असून अजूनही हरकती येण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रारूप मतदार यादीतील त्रुटी अंतिम यादी प्रसिद्ध करताना स्वतःहून दुरुस्त करण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे विधानसभा मतदारसंघ क्रमांक २७६ मधील भाग १ ते ३१५ आणि मतदारसंघ क्रमांक २७४ मधील भाग १ ते १८६ साठी नियुक्त सर्व बी.एल.ओ. व पर्यवेक्षकांना दि. ४ डिसेंबरपर्यंत विभागीय कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.प्रारूप मतदार यादीशी संबंधित कामकाजात कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर निवडणूकविषयक कामात अडथळा आणल्याबाबत निवडणूक विभागाकडून पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.