शहरं
Join us  
Trending Stories
1
थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
2
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
3
बीसीसीएल आयपीओ अलॉटमेंट आज, तुम्हाला मिळालाय का शेअर; GMP किती? जाणून घ्या
4
विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन...
5
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
6
इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने इम्रान खान-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!
7
Stock Market Today: शेअर बाजारात कमकुवत सुरुवात, निफ्टीमध्ये ८४ अंकांची घसरण; 'हे' शेअर्स आपटले
8
WPL 2026: Harmanpreet Kaur ची वादळी खेळी! MI चा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय
9
२०२६ मध्ये माघी गणपती कधी? पाहा, श्री गणेश जयंती तारीख, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन
11
२०२६चा पहिला प्रदोष शिवरात्रि योग: ‘असे’ करा शिव व्रत, पूजेत ‘या’ वस्तू हव्याच; पाहा, मान्यता
12
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
13
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
14
बेंगळुरू-पॅरिस विमानाचे तुर्कमेनिस्तानात आणीबाणीचे लँडिंग! हवेतच इंजिन निकामी झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला
15
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
16
प्रचाराच्या रणधुमाळीत 'परश्या'ची एन्ट्री; काँग्रेसच्या उमेदवारासाठी मैदानात उतरला आकाश ठोसर
17
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
18
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
19
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
20
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  आधुनिक तंत्रज्ञानाचा घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रासाठी आयुक्तांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 11:35 IST

घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातील ऊर्जा व तत्सम इंधन बनविणारे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय  पातळीवर उपलब्ध आहे. त्यावर आधारित सुमारे ५० कोटी रुपये खर्च असणारे हे प्रक्रिया केंद्र कोल्हापूर जिल्ह्यात उभारणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे आधुनिक तंत्रज्ञानाचा घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रासाठी आयुक्तांना भेटणारकोल्हापूर कॉलिंग, फोरसाईटची माहिती : पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा करणार

कोल्हापूर : घनकचरा व्यवस्थापन धोरणानुसार सुनियोजित पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने अनेक राज्यांत बांधकामांना स्थगितीचे आदेश दिले. घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातील ऊर्जा व तत्सम इंधन बनविणारे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय  पातळीवर उपलब्ध आहे. त्यावर आधारित सुमारे ५० कोटी रुपये खर्च असणारे हे प्रक्रिया केंद्र कोल्हापूर जिल्ह्यात उभारणे आवश्यक असून, त्यासाठी पालकमंत्री चंद्र्कांत पाटील, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती कोल्हापूर कॉलिंगचे पारस ओसवाल व फोरसाईट रिन्युएबल टेक्नॉलॉजीचे डॉ. सुभाष नियोगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.कोल्हापूर कॉलिंग, क्रिडाई कोल्हापूर, बिल्डर असोसिएशन ऊर्फ इंडिया व फोरसाईट रिन्युएबल टेक्नॉलॉजीच्या वतीने या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ओसवाल व डॉ. नियोगी म्हणाले, घनकचरा व्यवस्थापन धोरण तयार होऊन तीन वर्षे झाली तरीही सुनियोजित पद्धतीने त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने अनेक राज्यांत सर्व प्रकारच्या बांधकामावर बंदी आणली.

कचरा व्यवस्थापनांतर्गत त्याच्यावर प्रक्रिया करून आधुनिक तंत्रज्ञानाने त्यामधील ऊर्जा व तत्सम इंधन बनविणे सहजशक्य आहे. भारत सरकारने घनकचरा व्यवस्थापनासाठी अंदाजे ३६,८२९ कोटी रुपये मंजूर केले तर कोल्हापूर महानगरपालिकेनेही ३६ कोटी रुपयांचे टेंडरचे काम प्रक्रियेत आहे.कोल्हापुरातील ‘झूम’ प्रकल्प येथील कचऱ्याचे ‘कॅपिंग’ (कचऱ्याच्या ढिगावर माती टाकून दाबून टाकणे) करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून पुढे आला असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आहे. त्याऐवजी मुख्य प्रकल्पात घनकचरा, ओल्या कचऱ्यापासून खत, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील गाळखतासाठी प्रक्रिया, बांधकाम कचरा, जैववैद्यकीय कचरा, इत्यादी पूर्णपणे शासनाच्या मालकीचा असून, त्यातून निर्माण होणाऱ्या उत्पादनांची दर्जेदार खते, आरडीएफ, खडी, वाळू, इत्यादी विक्री प्रशासनामार्फतच करण्यात येते.

त्यासाठी हे आधुनिक तंत्रज्ञ वापरून निर्माण केलेले घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र महापालिकेने स्वीकारावे असे आवाहन केले. यासाठी कोल्हापूर कॉलिंग, क्रिडाई कोल्हापूर, बिल्डर असोसिएशन ऊर्फ इंडिया व फोरसाईट रिन्युएबल टेक्नॉलॉजी या कंपन्या आवश्यक ते सहकार्य करतील, असेही सांगण्यात आले.पत्रकार परिषदेस ‘क्रिडाई’चे अध्यक्ष महेश यादव, घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ सुभाष नियोगी, निवृत्त अणुशास्त्रज्ञ रमेश काकडे, बिल्डर असोसिएशनचे राजू लिंग्रज, सुरेश खाडिलकर, असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सचे अध्यक्ष अजित कोराणे, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर