शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘एफआरपी’बाबत गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक, सहकार मंत्र्यांची मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:22 IST

एफआरपी व बॅँकांकडून मिळणारी उचल यामध्ये ५00-६00 रुपयांची तफावत असून, तेवढी रक्कम बॅँकांना देण्यास तयार नसल्याने सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी एफआरपी देणेच शक्य नाही. याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी (दि. १०) बैठक आयोजित केली आहे, तत्पूर्वी मंगळवारी (दि. ८) मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अडचणी मांडण्याचा निर्णय रविवारी झालेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्दे‘एफआरपी’बाबत गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक, सहकार मंत्र्यांची मध्यस्थी सरकारच्या मदतीशिवाय उचल अशक्यच, कारखानदारांची भूमिका

कोल्हापूर : एफआरपी व बॅँकांकडून मिळणारी उचल यामध्ये ५00-६00 रुपयांची तफावत असून, तेवढी रक्कम बॅँकांना देण्यास तयार नसल्याने सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी एफआरपी देणेच शक्य नाही. याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी (दि. १०) बैठक आयोजित केली आहे, तत्पूर्वी मंगळवारी (दि. ८) मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अडचणी मांडण्याचा निर्णय रविवारी झालेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला.एफआरपीबाबत जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक रविवारी कोल्हापुरात झाली. यामध्ये ऊस दरावरून निर्माण झालेल्या कोंडीवर चर्चा झाली. हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले, तरी शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडलेली नाही. शेतकऱ्यांची कर्जे थकली असून, खते, बियाणे व औषधांसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. याबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष असल्याची चर्चाही बैठकीत झाली; पण एफआरपीची रक्कम व बॅँकांकडून मिळणारी उचल यात मोठी तफावत असून, तेवढी कर्जरूपाने उचल वाढवून देण्यास बॅँका तयार नसल्याने एकरकमी पैसे देणेच अशक्य आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून गुरुवारच्या बैठकीपूर्वी उद्या, मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याची विनंती कारखानदारांनी केली. ती मान्य करत उद्या, मंगळवारी मोजकेच कारखानदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यामध्ये कारखानदारीसमोरील अडचणी सांगून मदत करण्याची विनंती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, के. पी. पाटील, योगेश पाटील, आदी उपस्थित होते.

‘स्वाभिमानी’च्या धास्तीने भरणा थांबविलाकारखानदारांनी एफआरपीच्या ८० टक्क्याप्रमाणे उसाची बिले भरण्याची तयारी केली होती. आज, सोमवारपासून त्याचा भरणा संबंधित बॅँकांत केला जाणार होता; पण ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने एफआरपीचे तुकडे करून पैसे दिले तर कारखाने बंद पाडण्याचा इशारा दिला होता. कारखानदारांनी त्याचा धसका घेऊन भरणाच थांबविला.

शेतकऱ्यांबद्दलही बैठकीत चिंताहंगाम सुरू होऊन दोन महिने झाले, तरी शेतकऱ्यांना पैसे देता आलेले नाहीत. याबाबत सर्वच कारखानदारांनी चिंता व्यक्त करत या संकटातून लवकर मार्ग काढावा, अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर