शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

कोल्हापूर : लालभडक कलिंगडे बाजारात, सीताफळ, सफरचंदांसह फळांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 11:27 IST

आॅक्टोबर हिटमध्ये गारवा देण्यासाठी लालभडक कलिंगडे बाजारात दाखल झाली आहेत. काळ्या पाठीच्या कलिंगडांची कर्नाटकातून आवक सुरू झाली असून, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सीताफळ, सफरचंदांसह इतर फळांची आवक चांगलीच वाढली आहे. भाजीपाल्याच्या मागणीही वाढ झाल्याने दर काहीसे तेजीत राहिले आहेत.

ठळक मुद्देलालभडक कलिंगडे बाजारात, सीताफळ, सफरचंदांसह फळांची आवक वाढलीभाजीपाल्याच्या मागणीत वाढ, दर काहीसे तेजीत

कोल्हापूर : आॅक्टोबर हिटमध्ये गारवा देण्यासाठी लालभडक कलिंगडे बाजारात दाखल झाली आहेत. काळ्या पाठीच्या कलिंगडांची कर्नाटकातून आवक सुरू झाली असून, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सीताफळ, सफरचंदांसह इतर फळांची आवक चांगलीच वाढली आहे. भाजीपाल्याच्या मागणीही वाढ झाल्याने दर काहीसे तेजीत राहिले आहेत.जूननंतर गायब झालेली कलिंगडे आता बाजारात दिसू लागली आहेत. कर्नाटकातून काळ्या पाठीच्या कलिंगडांची आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात ३० रुपये दर राहिला आहे. आॅक्टोबर हिटमुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंडगार कलिंगडांमुळे थोडासा गारवा मिळत आहे.

सीताफळांची आवकही बाजारात वाढली आहे. (छाया- आदित्य वेल्हाळ) 

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर इतर फळांचीही रेलचेल वाढली असून, सीताफळ, सफरचंद, चिक्कंूची आवक मोठ्या प्रमाणात आहे. सीताफळ ८० ते १०० रुपये, तर सफरचंदांचा ७० ते ८० रुपये किलोपर्यंत दर आहे. संत्र्यांची आवकही सुरू झाली असून, बोरांचेही आगमन यंदा थोडे लवकरच झाले आहे. घाऊक बाजारात टपोरी बोरे २५ रुपये किलो आहेत. पेरूंची आवकही कायम असून, सांगली व कर्नाटकातून पेरूंची आवक जोरात सुरू आहे.भाजीपाल्याची मागणी वाढल्याने दरात थोडी वाढ झालेली दिसते. एरव्ही घाऊक बाजारात चार रुपये किलो असणारा कोबी आता सहा रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वांगी, ओला वाटाणा, भेंडी, वरणा, दोडक्याच्या दरांत वाढ झालेली आहे. टोमॅटोच्या दरात मात्र पुन्हा घसरण झाली असून, १० रुपये किलोपर्यंत दर खाली आला आहे.

फ्लॉवरचा दर स्थिर आहे. कोथिंबीर चांगलीच भडकली असून, किरकोळ बाजारात ३० रुपये पेंढी झाली आहे. मेथी १० ते १५, पालक १० रुपये दर आहे. ऐन सणासुदीत कडधान्याचे मार्केट काहीसे स्थिर राहिले आहे. साखरेच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही.लिंबूच्या मागणीत वाढउन्हाचा तडाखा वाढल्याने शीतपेयांच्या मागणीतही वाढ झाली आहे. परिणामी लिंबूचा उठावही चांगला होत आहे. पावसाळ्यात काहीशी मंदावलेली मागणी आता वाढू लागली असून, किरकोळ बाजारात १० रुपयांना तीन लिंबू असा दर झाला आहे.

कांदा-बटाटा वधारलागेले पाच-सहा महिने स्थिर असलेल्या कांदा व बटाट्याचे दर काहीसे वधारले आहेत. घाऊक बाजारात कांदा सरासरी १५, तर बटाटा २० रुपये किलोपर्यंत राहिला आहे. लसणाचा दर २५ रुपये असा स्थिर राहिला आहे.

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फळमार्केट एकदम तेजीत आहे. सफरचंद, पेरू, चिक्कू, सीताफळांची आवक वाढली असून, कलिंगडेही यंदा लवकर बाजारात आली आहेत.- मुस्तफा बागवान (फळ विक्रेते) 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर