शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बाजार समितीच्या ‘हुशारी’ने व्यापाऱ्यांच्या ‘बनवेगिरी’ला चाप, कर्नाटकातील ३० टन गूळ पकडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:24 IST

साडेतीन लाखांचा दंड वसूल

कोल्हापूर : शाहू मार्केट यार्ड येथील पत्त्यावर महालिंगपूर (कर्नाटक) येथील गूळ गुजरातला पाठवण्यात येणारा ३० टन गुळाचा ट्रक कोल्हापूर बाजार समिती प्रशासनाने पकडला. संबंधित व्यापाऱ्यांकडून साडेतीन लाख रुपये दंड वसूल केला आहे. दोनच दिवसांपूर्वी साडेतीन कोटींचा काजू पकडला होता. त्यापाठोपाठ दुसरी कारवाई केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.कोल्हापूर गुळाच्या नावाखाली कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गूळ गुजरातला पाठवला जातो. अशा तक्रारी अनेक वर्षे सुरू आहेत. महालिंगपूर येथून ३० टन गूळ भरलेला ट्रक गुरुवारी रात्री बाजार समितीच्या आवारात लावला होता. समितीच्या सुरक्षा रक्षकांच्या तपासणीत अधिक चौकशी करता, हे प्रकरण उघडकीस आले.समितीचे परवानाधारक जे. के. ट्रेडर्सचा हा गूळ असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांना बोलावले. या गुळाचा सेस ३५ हजार होतो; पण समितीच्या कायद्यानुसार दहा पट म्हणजेच साडेतीन लाख रुपये दंड वसूल केला आहे. यावेळी सभापती सूर्यकांत पाटील यांच्यासह संचालक नाना कांबळे, दिलीप पोवार, सचिव तानाजी दळवी, उपसचिव वसंत पाटील, विभागप्रमुख अनिल पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

सापडला म्हणून चोर..संबंधित व्यापाऱ्याच्या गाडीवर स्थानिक चालक असल्याने त्याने गुरुवारी रात्री समिती आवारात आणून ट्रक लावला, म्हणूनच हे उघडकीस आले; पण राजरोसपणे कर्नाटकातील गूळ येथील परवानाधारक व्यापारी गुजरातसह इतर ठिकाणी पाठवतात, त्याला चाप लावण्याचे आव्हान समितीला आहे.

सभापतींची धास्ती..सभापती सूर्यकांत पाटील यांची निवड होऊन जेमतेम पंधरा दिवस झाले आहेत. त्यांनी आल्या बरोबर सेस चुकवणाऱ्याविरोधात मोहीम उघडली आहे. सेस चुकवणारी यंत्रणा येथे कार्यरत असून या यंत्रणेने आता सभापतींची धास्ती घेतली आहे.

समितीकडून सोयी-सुविधांची अपेक्षा करायची आणि सेस चुकवायचा हे चालणार नाही. यापुढे केवळ दंड वसूल करून थांबणार नाही, कायद्यातील तरतुदीनुसार कडक कारवाई करू. - सूर्यकांत पाटील (सभापती, बाजार समिती)