शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बाजार समितीत ‘कर्नाटकी’ गुळाला बंदी, शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 18:44 IST

कर्नाटकी गुळाला बंदी घालण्याचा निर्णय झाल्यानंतर सौद्याची कोंडी फुटली असली तरी सव्वा कोटीचा गूळ समितीत पडून आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्नाटकी गुळाची आवक होत असल्याने दरात घसरण होते, त्यामुळे हा गूळ बंद करा व गुळाला किमान प्रतिक्विंटल ३७०० रुपये भाव द्या, या मागणीसाठी मंगळवारी शेतकऱ्यांनी गूळ सौदे काढण्यास खरेदीदारांना रोखले. अडते, व्यापारी व शेतकऱ्यांच्या बैठकीत कर्नाटकी गुळाला बंदी घालण्याचा निर्णय झाल्यानंतर सौद्याची कोंडी फुटली असली तरी सव्वा कोटीचा गूळ समितीत पडून आहे.या हंगामात बाजार समितीत गुळाचे दर तुलनेत कमी आहेत. गेली आठ दिवस दरात आणखी घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल होते. याची ठिणगी सोमवारी सौद्यानंतर पडली. मंगळवारी बॉक्समधील गुळाचा सौदा सुरू होता. ४६६३ बॉक्सचे सौदे झाले. मात्र, सरासरी दर ३६०० रुपयांपर्यंत राहिल्याने शेतकऱ्यांनी सौदे रोखले. प्रतिक्विंटल ३७०० रुपये दर देत असाल तरच सौदे सुरू करा, अशी भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला.समितीचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये शेतकरी आक्रमक होत कर्नाटक गूळ बंद करण्याची मागणी केली. यावर, खुले मार्केट असल्याने कोणत्याही मालाला बंदी घालता येत नाही, अशी भूमिका काहींनी मांडली.

हंगामात कर्नाटकातून फार कमी गूळ येतो, त्यामुळे दरावर परिणाम होण्याचा प्रश्न येत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही शेतकऱ्यांचा तोटा होत असेल तर आम्ही बंद करतो, असे आश्वासन दिल्यानंतर कोंडी फुटली. प्रशासकीय मंडळाचे सदस्य बाजीराव जाधव, समितीचे सचिव जयवंत पाटील, उपसचिव के. बी. पाटील, व्यापारी अतुल शहा, युवराज पाटील, देवानंद सरनोबत (तिरपण), विजय जाधव (तळाशी), सचिन पाटील (तिरपण), अमित पाटील व धनाजी कोकाटे (खुपीरे) आदी उपस्थित होते.

दर ३७०० का ४५०० हजार हवागुळाच्या दराचा विषय बैठकीत ताणला असताना, व्यापारी-अडते असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम खाडे म्हणाले, यापूर्वी साडेचार हजार रुपयांपर्यंत दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे ३७०० रुपयांपेक्षा अधिक मिळाला पाहिजे. सध्या प्रतिक्विंटल दोनशे रुपये दर कमी आहे.

संचालक मंडळाने तर वाटच लावली

कर्नाटकी गुळासह सगळे प्रश्न गेली अनेक वर्षे भेडसावत आहेत. दरवर्षी आम्ही ओरड करतो, पुढे काहीच होत नाही. संचालक मंडळाने तर आमची वाट लावल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

दृष्टिक्षेपात शिल्लक गूळ

  • गुळाच्या ४६६३ बॉक्सचे सौदे झाले.
  • गुळाच्या ४३५५ बॉक्सचे सौदे नाही
  • पाच व दहा किलोचे २२ हजार रव्यांचे सौदे नाहीत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड