कोल्हापूर : मराठी लेखकांना राजकारणाची भीती : नागनाथ कोत्तापल्ले, ‘पारध्याची गाय’ कथासंग्रहाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 14:01 IST2018-04-17T14:01:47+5:302018-04-17T14:01:47+5:30

मराठी लेखक राजकारणापासून दूर राहणारे आहेत. त्यांना राजकारण आणि त्याच्या चित्रीकरणाची भीती वाटते. या लेखकांनी खंबीर भूमिका घेऊन बदल, परिवर्तनाच्यादृष्टीने लेखन करावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोमवारी येथे केले.

Kolhapur: Marathi writers fear of politics: Nagnath Kothapallay, publication of 'Pardhyachi Gay' Story | कोल्हापूर : मराठी लेखकांना राजकारणाची भीती : नागनाथ कोत्तापल्ले, ‘पारध्याची गाय’ कथासंग्रहाचे प्रकाशन

कोल्हापुरात सोमवारी ‘पारध्याची गाय’ या कथासंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून चिंतामणी कांबळे, शंकर पुजारी, भास्कर भोसले, अरविंद पाटकर, उत्तम कांबळे, शशी राय, अनिल म्हमाने, अमर कांबळे, साहिल शेख उपस्थित होते. (छाया : दीपक जाधव)

ठळक मुद्देमराठी लेखकांना राजकारणाची भीती : नागनाथ कोत्तापल्ले ‘पारध्याची गाय’ कथासंग्रहाचे प्रकाशन

कोल्हापूर : मराठी लेखक राजकारणापासून दूर राहणारे आहेत. त्यांना राजकारण आणि त्याच्या चित्रीकरणाची भीती वाटते. या लेखकांनी खंबीर भूमिका घेऊन बदल, परिवर्तनाच्यादृष्टीने लेखन करावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोमवारी येथे केले.

साहित्यिक उत्तम कांबळेलिखित ‘पारध्याची गाय’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनमध्ये ‘निर्मिती विचारमंच’तर्फे आयोजित या कार्यक्रमास लेखिका शशी राय, भास्कर भोसले प्रमुख उपस्थित होते.

डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘राजकारण आणि त्याच्या चित्रीकरणाला अधिकतर मराठी लेखक घाबरतात. देशातील अस्वस्थ परिस्थितीमध्ये मराठीतील आमचे अनेक लेखक हे मनोविश्लेषण करत होते. नव्या भारताची जडणघडण सुरू असताना पश्चिमात्त्य कादंबरी यांच्या नकला करण्याचे त्यांचे काम सुरू होते. नवीन समाज घडताना तत्कालीन परिस्थिती शब्दबध्द करण्याची लेखकाची जबाबदारी असते. ही जबाबदारी कांबळे यांनी पेलली आहे.’

या कार्यक्रमात लेखक उत्तम कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शंकर पुजारी, अमर कांबळे, कृष्णा पाटील, चिंतामणी कांबळे, आदी उपस्थित होते. अरविंद पाटकर यांनी स्वागत केले. अनिल म्हमाने यांनी प्रास्ताविक केले. कवी साहिल शेख यांनी सूत्रसंचालन केले. शोभा चाळके यांनी आभार मानले.

 

 

Web Title: Kolhapur: Marathi writers fear of politics: Nagnath Kothapallay, publication of 'Pardhyachi Gay' Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.