Kolhapur: माणिक वाघमारे कोल्हापूर विभागाचे नवे क्रीडा उपसंचालक
By सचिन भोसले | Updated: August 18, 2023 23:53 IST2023-08-18T23:53:09+5:302023-08-18T23:53:25+5:30
Kolhapur News: क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभागाच्या उपसंचालक पदी माणिक वाघमारे यांची शुक्रवारी रात्री नियुक्ती झाली. हे पद संजय सबनीस यांच्या बदलीमुळे रिक्त होते.

Kolhapur: माणिक वाघमारे कोल्हापूर विभागाचे नवे क्रीडा उपसंचालक
कोल्हापूर - क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभागाच्या उपसंचालक पदी माणिक वाघमारे यांची शुक्रवारी रात्री नियुक्ती झाली. हे पद संजय सबनीस यांच्या बदलीमुळे रिक्त होते.
वाघमारे यांनी यापूर्वी कोल्हापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून २०१५ ते २०१८ या कालावधीत काम केले आहे.तत्पूर्वी ते २०१२ ते २०१५ या कालावधीत गडचिरोली येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते.सध्या सांगली येथे याच पदावर ते कार्यरत आहेत. उत्कृष्ट धावपटू म्हणून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. गडचिरोली येथे प्रथमच जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून केलेल्या कामाची तत्कालीन गृहमंत्री आर .आर पाटील यांनी त्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले होते.