कोल्हापूर : महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट उभारणार धर्मशाळा, माफक दरात शंभर खोल्यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 06:01 PM2018-02-03T18:01:07+5:302018-02-03T18:31:01+5:30

कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांची मोफत भोजनरूपी प्रसादाची सोय करणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या राहण्याची सोयसुद्धा माफक दरात व्हावी, या हेतूने १०० खोल्यांच्या तीन धर्मशाळा उभारण्याचा संकल्प केला आहे.

Kolhapur: Mahalaxmi Anna Chhatra Seva Trust will be constructing Dharmashala, 100 rooms at reasonable prices. | कोल्हापूर : महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट उभारणार धर्मशाळा, माफक दरात शंभर खोल्यांची सोय

कोल्हापूर : महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट उभारणार धर्मशाळा, माफक दरात शंभर खोल्यांची सोय

googlenewsNext
ठळक मुद्देअत्याधुनिक सुविधा , माफक दरात शंभर खोल्यांची सोय, महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट उभारणार धर्मशाळा

कोल्हापूर : कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांची मोफत भोजनरूपी प्रसादाची सोय करणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या राहण्याची सोयसुद्धा माफक दरात व्हावी, या हेतूने १०० खोल्यांच्या तीन धर्मशाळा उभारण्याचा संकल्प केला आहे.

पहिल्या टप्प्यात २५ खोल्या येत्या मे महिन्यापर्यंत भाविकांच्या सेवेत दाखल होतील, तर ७५ खोल्यांचे बांधकाम पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. ही केवळ धर्मशाळाच असणार नाही, तर भाविकांच्या दृष्टीने हे राहण्याची सर्वोत्तम, चांगल्या दर्जाची सुविधा देणारे केंद्र असेल, असा विश्वास ट्रस्टींनी व्यक्त केला आहे.

याबाबत ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली. कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र चालविण्याचा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे चालविला जात असून, उत्तम सेवा, गुणवत्ता यांच्या जोरावर ट्रस्टने भाविक वर्गात नावलौकिक प्राप्त केला आहे.

सध्या भाविकांच्या राहण्याची उत्कृष्ट सेवा महालक्ष्मी भक्त मंडळ देत आहे. तरीही जागेअभावी आणखी सोय करता येत नाही; म्हणूनच ही गरज लक्षात घेऊन महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे नवीन धर्मशाळा उभी करण्याचा संकल्प केला आहे. अंबाबाई मंदिराच्या काही अंतरावर असलेल्या राजोपाध्ये बोळातील पंतवाडा विकत घेऊन त्या ठिकाणी ही धर्मशाळा बांधण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील २५ खोल्या मे महिन्यापर्यंत, तर उर्वरित ७५ खोल्यांचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण करण्याचा निश्चय असून, धर्मशाळेत रेस्टॉरंट, पार्किंगसह राहण्याची उत्तम सोय केली जाईल. प्रत्येक खोलीत टी.व्ही., गरम पाण्याची सोय, वाय-फाय सुविधा, अंतर्गत सजावट चांगली असेल. एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांचा खर्च त्यासाठी अपेक्षित असला तरी तो देणगी आणि कर्ज यांच्या माध्यमातून उभा केला जाईल.

विशेष म्हणजे या प्रकल्पास काही बॅँकांही कर्ज देण्याकरिता पुढे आलेल्या आहेत. भविष्यात एक हजार खोल्यांची धर्मशाळा उभारण्याचे ट्रस्टचे उद्दिष्ट असले तरी पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने हे कार्य पूर्ण केले जाईल. आजकाल भाविक मोठ्या संख्येने कोल्हापुरात येतात; परंतु त्यांना राहण्यास जागा उपलब्ध होत नसल्याने ते आल्यादिवशीच देवीचे दर्शन घेऊन परत जातात.

भाविक कोल्हापुरात मुक्काम करायला लागले की येथील व्यवसायांत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळेच आम्ही धर्मशाळा उभारण्याच्या प्रयत्नात आहोत, असे राजू मेवेकरी यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संजय जोशी, कार्यवाह सुनील खडके, खजानिस प्रशांत तहसीलदार, राजेश सुगंधी, आदी उपस्थित होते.

 

Web Title: Kolhapur: Mahalaxmi Anna Chhatra Seva Trust will be constructing Dharmashala, 100 rooms at reasonable prices.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.