शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गुळाच्या एका आधणामागे हजाराचा तोटा, गूळ उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:13 IST

गुळाच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाल्याने गूळ उत्पादक अडचणीत आला आहे. सध्या गुळाला सरासरी प्रतिक्विंटल ३००० ते ३४०० रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने या दरामुळे फायदा राहू दे, उलट तोटाच पदरात पडत असल्याने गूळ उत्पादक आतबट्ट्यात आले आहेत.

ठळक मुद्देगुळाच्या एका आधणामागे हजाराचा तोटा, गूळ उत्पादक अडचणीतमिळणाऱ्या उत्पन्न-खर्चाचा ताळमेळ बिघडला, ३५०० रुपये किमान दर मिळावा

कोल्हापूर : गुळाच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाल्याने गूळ उत्पादक अडचणीत आला आहे. सध्या गुळाला सरासरी प्रतिक्विंटल ३००० ते ३४०० रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने या दरामुळे फायदा राहू दे, उलट तोटाच पदरात पडत असल्याने गूळ उत्पादक आतबट्ट्यात आले आहेत.

एका आधणामागे ८३०० ते ८५०० रुपये खर्च होत असताना मिळणारे उत्पन्न ६६०० ते ७०४० रुपये इतके मिळत आहे. म्हणजेच एका आधणामागे हजार ते दीड हजार रुपयांचे नुकसान सहन करून गुऱ्हाळे चालवावी लागत असल्याने गूळ उत्पादक अस्वस्थ आहेत.उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बिघडत चालल्याने गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरची ओळख असणारा गूळ उद्योग अडचणीत आला आहे. १२०० गुऱ्हाळघरे असणाऱ्या जिल्ह्यात आता केवळ १३० ते १८० इतक्याच गुऱ्हाळघरांवर गुळाचे उत्पादन घेतले जात आहे.

गेल्या वर्षी ही संख्या २४० च्या आसपास होती. म्हणजेच एका वर्षात आणखी ६० ते ११० गुऱ्हाळघरे बंद पडली आहेत. मजुरांची कमतरता असतानाही प्रसंगी नुकसान सहन करून गुऱ्हाळघरे चालविली जात आहेत. त्यामुळे साहजिकच दराचीही अपेक्षा वाढली आहे.यावर्षी उसाचा उतारा कमी झाल्याने हंगाम लवकर संपणार आहे. त्याचा फटका गुऱ्हाळघरांनाही बसणार आहे. ऊसच उपलब्ध नसल्याने लाखोंची गुंतवणूक करून सुरू केलेली गुऱ्हाळघरे लवकर बंद होऊन उत्पादकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता आवक आहे तोवर दर चांगला मिळावा, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे.

साखरेच्या दरावर ठरतो गुळाचा दरसाखरेचे घाऊक दर २९०० ते ३००० रुपये क्विंटलपर्यंत खाली असल्याने त्याचा फटका गुळाला बसला असल्याचे व्यापारी सांगत आहेत. गुळाची मागणीही कमी झाल्याचे म्हणणे आहे. या सर्वांचा परिणाम होऊन दर कमी होत आहे, असे व्यापारी सांगत असलेले कारण मात्र गूळ उत्पादक शेतकऱ्यांना पटलेले नाही. दर पाडण्यासाठी ते कारण शोधत असल्याचा आरोप आहे.

महिन्याभरात ५०० ते ९०० रुपयांनी घसरणहंगाम सुरू होताना सरासरी ३९०० रुपये प्रतिक्विंटल असणारा गुळाचा दर आता ३००० ते ३४०० रुपयांवर आला आहे. गेल्या महिनाभरात ५०० ते ९०० रुपयांनी दरात घसरण झाली आहे.

 

किमान ३५०० रुपये भाव मिळणे आवश्यक उसाच्या कमी उपलब्धतेमुळे आधीच हंगाम जास्त दिवस चालणार नाही, अशी चिंता असताना आता दरही कमी होत असल्याने उत्पादक अडचणीत आहे. किमान ३५०० रुपये भाव मिळाल्याशिवाय या अडचणीतून तो बाहेर पडणे शक्य नाही.

: राजेंद्र पाटील, गूळ उत्पादक, निगवे

 

उत्पादकाला येणारा खर्च (एका आधणासाठी)एका आधणातून २२० किलो गूळ मिळतो. एका आधणासाठी दोन टन उस लागतो. त्याचा सरासरी दर २८०० ते ३२०० रुपये प्रतिटन गृहीत धरल्यास ही किंमत ५६०० ते ६४०० रुपये इतकी होते. वाहतूक, मजुरी, रसायने, घाणा भाडे, आदींसह २७०० रुपये लागतात. असा एकूण एका आधणासाठी ८३०० ते ८६०० खर्च होतो.उत्पादकाला मिळणारे उत्पन्न (एका आधणातून)एका आधणातून २२० किलो गूळ मिळतो. याला सरासरी ३० ते ३२ रुपये दर गृहीत धरल्यास ६६०० ते ७०४० रुपये इतके उत्पन्न मिळते. दिवसाला पाच आधणे घेतली जातात. म्हणजेच दररोजचा तोटा पाच हजारांचा आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर