शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाला लुटले, साडेतीन लाख किमतीचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 17:57 IST

रुईकर कॉलनी येथील मैदानावर फिरायला आलेल्या वृद्धाला दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील साडेतीन लाख किमतीचे सोन्याचे दागिने व घड्याळ लुटून पोबारा केला. रविवारी (दि. ४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देपोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाला लुटलेसाडेतीन लाख किमतीचा ऐवज लंपास रुईकर कॉलनी येथील घटना

कोल्हापूर : रुईकर कॉलनी येथील मैदानावर फिरायला आलेल्या वृद्धाला दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील साडेतीन लाख किमतीचे सोन्याचे दागिने व घड्याळ लुटून पोबारा केला. रविवारी (दि. ४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.अधिक माहिती अशी, शिवाजी महादेव लायकर (वय ६४, रा. एल. आय. सी. कॉलनी, रुईकर कॉलनी परिसर) यांचे इचलकरंजी येथे चित्रपटगृह होते. पाच वर्षांपूर्वी ते कोल्हापुरात राहण्यास आले. रुईकर कॉलनीमध्ये त्यांचा स्वत:चा बंगला आहे. ते आणि पत्नी असे दोघेच तेथे राहतात.

तीन मुली विवाहित आहेत. लायकर हे रोज शिवाजी विद्यापीठात फिरायला जातात. रविवारी कारचालकाला सुटी असल्याने ते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रुईकर कॉलनी येथील मैदानावर फिरायला गेले.

फिरत असताना दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्या समोर आल्या. एकाने आम्ही पोलीस आहोत, ओळखले नाही का, अंगावर सोने घालून फिरू नका, चार दिवस झाले लुटमार सुरू आहे, सोने काढून खिशात ठेवा, असे सांगत सोबतच्या व्यक्तीकडून रुमाल घेऊन तो लायकर यांना दिला. त्यांनी भीतीने अंगावरील दहा तोळ्याची चेन, अंगठी, टायटन घड्याळ असा सुमारे साडेतीन लाख किमतीचा ऐवज रुमालात ठेवला. ‘त्या’ व्यक्तींनी रुमालाची गाठ बांधतो असे म्हणून तो हातात घेत पोबारा केला.

‘त्या’ दोन व्यक्ती दागिने घेऊन पळून गेल्याने लायकर भांबावून गेले. घाईगडबडीने ते घरी आले. पत्नीला घडलेला प्रकार सांगून त्यांनी रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेत आहेत.लुटमारीचे प्रमाण जास्तगेल्या महिन्याभरात पोलीस असल्याची बतावणी करून शहरभर वृद्ध महिला व पुरुषांना लुटले जात आहे. चार-पाच घटना घडूनही पोलिसांनी कोणतीच दक्षता घेतलेली नाही. या लुटमारीमुळे घराबाहेर पडणे नागरिकांना असुरक्षित झाले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हाPoliceपोलिस