कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पन्हाळा येथे लोकसभेच्या भाजप शिवसेना विजयी मिरवणुकीत माजी शिक्षण मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे सामील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 17:20 IST2019-05-23T17:18:41+5:302019-05-23T17:20:12+5:30
पन्हाळा येथे लोकसभा निवडणुकांची निकाल भाजपाच्या बाजुने लागताच एकच जल्लोष . पन्हाळ्यावर लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षाला मतदान झाले होते

कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पन्हाळा येथे लोकसभेच्या भाजप शिवसेना विजयी मिरवणुकीत माजी शिक्षण मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे सामील
पन्हाळा येथे लोकसभा निवडणुकांची निकाल भाजपाच्या बाजुने लागताच एकच जल्लोष . पन्हाळ्यावर लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षाला मतदान झाले होते तरुणांच्यात शिवसेनेचे धैर्यशील माने निवडुन येणार या विषयी औत्सुक्य होते अपेक्षित निकाल लागताच मोठा आनंदोत्सव करुन घरोघरी साखर वाटण्यात आली या दरम्यान गेले दोन दिवसांपासुन माजी शिक्षण मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे आण्णाभाऊ साठे यांचेवर वैचारीक पुस्तक लिहीण्यासाठी पन्हाळ्यावर राहीले आहेत ते पण लोकसभा निवडणुक निकाल ऐकण्यासाठी पन्हाळा एस.टी. स्टँड परीसरात आले असता विजयी मिरवणुकीत सामील होवुन भारतिय जनता पक्षाला शुभेच्छा दिल्या