शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

कोल्हापूर लोकमत महामॅरेथॉन :  ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ला तुडुंब प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 5:39 PM

‘विन्टोजीनो’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉन सीझन - २ च्या पर्वात पाच हजारांहून अधिक धावपटूंसह सर्वसामान्य कोल्हापूरकर व राज्यातील धावपटू सहभागी झाले आहेत. सर्व धावपटूंसाठी बीब कलेक्शन तसेच मार्गदर्शन एक्स्पोचे शनिवारी पोलीस ग्राउंड, अलंकार हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. त्यास सहभागी स्पर्धकांनी महाप्रतिसाद देत या एक्स्पोचा लाभ घेतला. ‘कोल्हापुरातील सर्वांत चांगले आणि नीटनेटके आयोजन’ अशी सर्वांनी दाद दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर लोकमत महामॅरेथॉन :  ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ला तुडुंब प्रतिसादधावपटूंना किट वितरण; आरोग्य तपासणी, व्यायाम, आहारावर तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन सतारवादनासह संगीताची मेजवानी

कोल्हापूर : ‘विन्टोजीनो’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉन सीझन - २ च्या पर्वात पाच हजारांहून अधिक धावपटूंसह सर्वसामान्य कोल्हापूरकर व राज्यातील धावपटू सहभागी झाले आहेत. सर्व धावपटूंसाठी बीब कलेक्शन तसेच मार्गदर्शन एक्स्पोचे शनिवारी पोलीस ग्राउंड, अलंकार हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. त्यास सहभागी स्पर्धकांनी महाप्रतिसाद देत या एक्स्पोचा लाभ घेतला. ‘कोल्हापुरातील सर्वांत चांगले आणि नीटनेटके आयोजन’ अशी सर्वांनी दाद दिली.सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या बीब वितरण कार्यक्रमात धावपटूंना किट देण्यात आली. याशिवाय आरोग्य तपासणी, व्यायाम, आहार, आदींविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सोबतीला रॉक बँड संगीताची मेजवानी सादर करण्यात आली. ‘एक्स्पो’चे उद्घाटन शाहू छत्रपती व ‘विन्टोजीनो’चे चेअरमन प्रकाश उपाध्याय यांच्या हस्ते अनोख्या पद्धतीने हवेत फुगे सोडून व ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेसमोर दीपज्योत अर्पण करून अभिनव पद्धतीने झाले.

यावेळी ‘माणिकचंद आॅक्सिरिच’चे सागर लालवाणी, ‘ट्रेडनेट’चे संचालक समीर कुलकर्णी, ‘एफडीसी’चे रिजनल मॅनेजर कृष्णात हसबे, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, ‘विद्याप्रबोधिनी’चे अध्यक्ष राहुल चिकोडे, ‘ट्रान्सट्रेड’चे चेअरमन दीप संघवी, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, संदीप अ‍ॅडस्चे संदीप खामितकर, ‘लोकमत’चे व्हाईस प्रेसिडेंट बी. बी. चांडक, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, डॉ. प्रांजली धामणे, चेतन चव्हाण, वैभव बेळगावकर, आदी मान्यवर उपस्थित होते.तंदुरुस्त तब्येतीसाठी धावा‘लोकमत’ समूहाने राज्यभरातील पाच प्रमुख शहरांत ‘विन्टोजीनो’ लोकमत महामॅरेथॉनच्या रूपाने धावण्याची चळवळ सुरू केली आहे. यंदा या महामॅरेथॉनचे कोल्हापुरात दुसरे पर्व सुरू झाले आहे. त्यात आरोग्यासाठी सर्वांनी धावले पाहिजे. स्वत:च्या तब्येतीची काळजी घेणे व नित्यनियमाने व्यायाम करणे ही काळाची गरज बनली आहे. ही बाब ध्यानी घेऊन ‘लोकमत’ने हा उपक्रम सुरू केला आहे; त्यास माझ्या शुभेच्छा!शाहू छत्रपती  

वर्ष आरोग्यदायी जावो!लोकमत समूह आणि ‘विन्टोजीनो’ समूहातर्फे यंदाच्या ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन केले आहे. त्यात कोल्हापुरात होणारी महामॅरेथॉन सीझन - २ ही विशेष मॅरेथॉन असणार आहे. २०१९ साल सुरू झाल्यापासून जगातील ही पहिली मॅरेथॉन असणार आहे. त्यामुळे ही संधी सर्वांनी सोडू नये. हे संपूर्ण वर्ष कोल्हापूरकरांसह सर्व सहभागी धावपटूंना आरोग्यदायी जावो.- प्रकाश उपाध्याय, चेअरमन, ‘विन्टोजीनो’आख्ख्या महाराष्ट्राला आरोग्यदायी ठरणार‘लोकमत समूहा’ने राज्यभरातील पाच प्रमुख शहरांत आयोजित केलेल्या महामॅरेथॉनमध्ये रविवारी होणारी कोल्हापूर महामॅरेथॉन सीझन- २ ही ‘विशेष मॅरेथॉन’ ठरणार आहे. ही महामॅरेथॉन संपूर्ण राज्याला आरोग्यदायी ठरणार आहे.- सागर लालवाणी, माणिकचंद आॅक्सिरिच 

धावपटूंनी असा व्यायाम करावा...फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रांजली धामणे यांनी दिल्या टिप्स- मॅरेथॉनच्या सहभागासाठी तीन, सहा महिन्यांपासून तयारी करा. आठवड्यातील सात दिवसांचे नियोजन करा. त्यात रविवारी दीर्घ धावणे, सोमवारी पाच किंवा सात कि.मी धावणे, उर्वरित दोन दिवसांत १०० व २०० मीटर स्प्रिंटची तयारी करा. उर्वरित तीन दिवसांत पोटाच्या स्नायूंचा, पायांचा, बोटांसाठीचा व्यायाम करा. दोन पायांत अंतर ठेवून पळा. एका मिनिटात १८० पावले (स्टेप्स) ही आयडियल रन आहे, त्याप्रमाणे स्वत:ही धावा. मॅरेथॉनमध्ये का धावतो याबद्दल आपले लक्ष्य ठरवा. धावल्यानंतर विश्रांती आवश्यक बाब आहे. प्रत्येकाचा फिटनेस वेगळा असतो. चांगला आहार, व्यायाम आणि विश्रांती या सर्व चांगला परफॉर्मन्स करण्याकरिता आवश्यक बाबी आहेत. धावताना पायांचे स्नायू मायक्रो डॅमेज होत असतात. त्यांची रिकव्हरी लवकर होण्यासाठी विश्रांती आवश्यक असते. धावल्यानंतर दुसऱ्या दिवशी विश्रांतीच्या काळात सायकलिंग, पोहणे असा क्रॉस ट्रेनिंग प्रशिक्षणाचा कार्यक्रम घ्यावा. पाणी भरपूर प्यावे. संतुलित आहार आवश्यक आहे. कार्बोहायड्रेट असलेला आहार घ्यावा. त्यात चपाती, भाजी, रताळे, शाबूदाणे, तर पिण्यासाठी इलेक्ट्रॉल पावडर पाण्यातून घ्यावी. प्रत्येक रनमध्ये प्रथम जोरात धावू नये. हार्ट रेट मेंटेन करा. धावण्याचा सराव करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक बाब आहे. त्यात तंदुरुस्ती तपासणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathonलोकमत कोल्हापूर महामॅरेथॉनkolhapurकोल्हापूर