शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कमी पटसंख्येच्या अंगणवाड्यांनाही कुलूप, शासनाचा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 16:51 IST

राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सेवानिवृत्तीची वयोमर्यादा कमी केल्यानंतर पटसंख्येच्या निकषात अडकून दुसरा झटका दिला. अांदोलनाची धास्ती घेऊन सेविका, मदतनिसांना अत्यावश्यक कायद्याच्या (मेस्मा) कक्षेत आणून त्यांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न सरकारने केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे.

ठळक मुद्देकमी पटसंख्येच्या अंगणवाड्यांनाही कुलूप, शासनाचा फतवा मानधनी सेवक म्हणता मग ‘मेस्मा’च्या कक्षेत का? कर्मचाऱ्यांचा सवाल

कोल्हापूर : राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सेवानिवृत्तीची वयोमर्यादा कमी केल्यानंतर पटसंख्येच्या निकषात अडकून दुसरा झटका दिला. अांदोलनाची धास्ती घेऊन सेविका, मदतनिसांना अत्यावश्यक कायद्याच्या (मेस्मा) कक्षेत आणून त्यांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न सरकारने केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० वर्षे केले. त्यामुळे राज्यातील साधारणत: १३ हजार, तर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे २७५ कर्मचारी १ एप्रिलला सेवामुक्त होणार आहेत. सेवानिवृत्तीकडे झुकलेल्या बहुतांशी महिला या विधवा, परितक्त्या, गरीब कुटुंबातील आहेत.

सरकारने अचानक हा निर्णय घेतल्याने कुटुंब कसे चालवायचे, असा पेच त्यांच्यासमोर आहे. या धक्क्यातून कर्मचारी सावरतात न सावरतात तोपर्यंत अंगणवाडी पटसंख्येबाबत निर्णय घेतला. २५ पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या अंगणवाड्या बंद केल्या जाणार आहेत. यामुळे डोंगराळ व दुर्गम भागातील मुलांची गैरसोय होणार आहे.शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटना आपल्या मागण्यांबाबत आंदोलन करतात; पण सर्वाधिक संख्या व आक्रमकपणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन असते. गेल्या वर्षी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करून सरकारच्या नाकात दम आणला होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना जखडून ठेवण्यासाठी त्यांना ‘मेस्मा’ कायद्यांतर्गत आणले आहे.

यापुढे कर्मचाऱ्यांना आंदोलनच करता येणार नाही. कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घेऊन त्याप्रमाणे सोयी-सुविधा देण्याची मागणी अनेक वर्षे आहे. मानधनसेवक म्हणता मग ‘मेस्मा’च्या कक्षेत का आणता, असा सवाल कर्मचारी करीत आहेत.

स्तनदा मातांचा समावेश?अंगणवाडीची पटसंख्या निश्चित करताना शुन्य ते तीन व तीन ते सहा वर्षे वयोगटांतील मुलांचा समावेश राहणार आहे. त्याशिवाय गर्भवती व स्तनदा मातांना येथूनच आहाराचा पुरवठा केला जात असल्याने त्यांची संख्याही पटसंख्येत गृहित धरली जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत २७ मार्चला मोर्चाअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसह ‘मेस्मा’ लागू करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात मंगळवारी ( दि. २७ मार्च) मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा पूर्ववत होईपर्र्यत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

 

सरकारने कर्मचाऱ्यांच्या तोंडाला आतापर्यंत पाने पुसली आहेत. त्यात ‘मेस्मा’च्या कक्षेत आणून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, त्याचा निषेध करतो. याविरोधात तीव्र आंदोलन छेडू.- सुवर्णा तळेकर,नेत्या, अंगणवाडी कर्मचारी संघटना 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरeducationशैक्षणिक