शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Local Body Election: गडहिंग्लजमध्ये ‘राष्ट्रवादी’ विरूद्ध ‘महायुती’ यांच्यातच सामना, नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:25 IST

३ प्रभागांत ३ पक्षांत बंडखोरी

गडहिंग्लज : गडहिंग्लजमध्ये ‘राष्ट्रवादी’ विरूद्ध ‘महायुती’ यांच्यातच चुरशीचा दुरंगी सामना होत आहे. ‘महायुती’मध्ये जनता दल, जनुसराज्य, भाजपा, शिंदे सेना, काँग्रेस हे पक्ष एकत्र आले आहेत. ‘मनसे’च्या महिला उमेदवाराला राष्ट्रवादीने पुरस्कृत केले असून, उद्धव सेना केवळ १ जागा स्वतंत्र लढवत आहे. नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदांच्या २२ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात आहेत.नगराध्यक्ष पदासाठी ‘राष्ट्रवादी’चे महेश तुरबतमठ व ‘महायुती’चे गंगाधर हिरेमठ यांच्यातच खरा दुरंगी सामना होईल. त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश कांबळे, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार विनोद बिलावर यांचे आव्हान आहे. याशिवाय वीरसिंग बिलावर व सचिन साबळे हे अपक्षही रिंगणात आहेत.‘महायुती’चे नेतृत्व आमदार डॉ. विनय कोरे, मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार शिवाजीराव पाटील, माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी तर ‘राष्ट्रवादी’चे नेतृत्व मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत.नगराध्यक्ष पदाच्या रिंगणातून १३ पैकी ७ उमेदवारांनी तर नगरसेवक पदाच्या रिंगणातील ७८ पैकी २६ उमेदवारांनी माघार घेतली. तहसीलदार ऋषिकेत शेळके हे निवडणूक निर्णय अधिकारी तर मुख्याधिकारी देवानंद ढेकळे हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

३ प्रभागांत ३ पक्षांत बंडखोरीराष्ट्रवादीचे रमजान अत्तार यांनी ‘प्रभाग २ अ’मध्ये तर जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बापू म्हेत्री यांची कन्या पूनम म्हेत्री यांनी ‘प्रभाग १ अ’ मध्ये तर ‘प्रभाग ६ अ’मध्ये भाजपाच्या आशा देवार्डे यांनी बंडखोरी केली आहे. उद्धव सेनेच्या माजी नगरसेविका श्रद्धा शिंत्रे या ‘प्रभाग ३ अ’ मधून स्वतंत्र लढत आहेत.

सहा प्रभागांत एकास एक लढतप्रभाग ५, ७, ८, ९, १० व ११ याठिकाणी एकास एक सरळ लढत होत आहे. प्रभाग १ ‘अ’ मध्ये तिरंगी, प्रभाग २ ‘अ’मध्ये चौरंगी, प्रभाग ३ ‘अ व ब’, प्रभाग ४ ‘अ’ व प्रभाग ६ ‘अ’ मध्ये तिरंगी सामना होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Gadhinglaj local body election sees Nationalist vs. Mahayuti battle.

Web Summary : Gadhinglaj witnesses a Nationalist vs. Mahayuti contest in local elections. The battle for Nagadhyaksha post sees six candidates. Internal rebellion in three wards makes the election interesting, with straight fights in six wards.