शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

कोल्हापूर : अंतिम लढा समजून रस्त्यावर उतरा, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:38 PM

गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. आता थांबायचे नाही, अंतिम लढाई समजून पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून सरकारच्या उरात धडकी भरेल, असा चक्का जाम करा, असे आवाहन इरिगेशन फेडरेशनचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले.

ठळक मुद्देअंतिम लढा समजून रस्त्यावर उतरा, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे आवाहन इरिगेशन फेडरेशनतर्फे सर्वपक्षीय शेतकरी मेळावा२१ जानेवारीला चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर : गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. आता थांबायचे नाही, अंतिम लढाई समजून पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून सरकारच्या उरात धडकी भरेल, असा चक्का जाम करा, असे आवाहन इरिगेशन फेडरेशनचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले.महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे २१ जानेवारीला पुणे-बंगलोर महामार्गावर शिरोली येथे पंचगंगा नदी पुलावर चक्काजाम आंदोलन होणार आहे. याच्या नियोजनासाठी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सर्वपक्षीय शेतकरी मेळावा झाला. प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार संपतबापू पाटील, इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील, आर. जी. तांबे, वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे, माजी सभापती बाबासो पाटील-भुयेकर, मारुतराव जाधव, मारुती पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, सरकार आश्वासन देत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून आंदोलनाची तारीख पुढे सरकत गेली. आता थांबणे शक्य नाही. शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. वीज कनेक्शन तुटू नये म्हणून संयमाने घेतले; पण आता पाणी डोक्यावरून चालले आहे. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत, पदरात पाडून घ्यायची हीच योग्य वेळ आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी ताकदीने आंदोलनात उतरावे.खासदार महाडिक म्हणाले, नुसती आश्वासने देणाऱ्या सरकारला कोणाच्याच मागण्या मान्य करायच्या नाहीत, असे दिसत आहे. उद्योजकांना रस्त्यावर आणणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडले आहे. शेतकरी आत्महत्या वाढत असताना उपाययोजना राहू देत, मृत्यूची आकडेवारीदेखील बाहेर जाऊ नये, याची दक्षता हे सरकार घेत आहे. या सरकारला घरी बसविण्याची हीच संधी आहे. आजचे मरण उद्यावर ढकलून चालणार नाही. तलवार शेतकऱ्यांच्या मानेवर पडणार आहे.माजी आमदार संपतबापू पाटील म्हणाले, सरकारकडे पैसे नाहीत आणि शेतकऱ्यांकडेही नाहीत. दोघेही कंगाल आणि रिकामे आहेत. कंगालाकडून कसली वसुली करताय. सरकारने रिकाम्या माणसाला समजून घ्यावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. भगवान काटे यांनी कळणाऱ्या भाषेतच आम्ही आंदोलने करतो, राज्यकर्त्यांना गांधीगिरी कळत नाही. हातात बुडका घेऊनच वठणीवर आणतो, असे सांगून ऊस बिलाचा पत्ता नाही आणि मग वीजेची बिले कशी काय मागता? असा सवाल केला. आर. जी. तांबे, विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी मनोगत व्यक्त करताना चक्काजाम ताकदीने करण्याचे आवाहन केले.महाडिक नको, राष्ट्रवादीचे म्हणाधनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना चक्काजाम आंदोलनात मोठ्या प्रमाणावर आणावे, असे इरिगेशन फेडरेशनचे कार्यकर्ते रणजित जाधव यांनी सूत्रसंचालन करताना सांगितले. यावर खासदार महाडिक यांनी पटकन महाडिक नको राष्ट्रवादीची युवा शक्ती म्हणा, असे हळूच सांगितले. खासदारांना राष्ट्रवादीतून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर किती धसका घेतलाय, याचीच प्रचिती आली.

पवारांचेच सरकार येणारआता पवारांचेच सरकार येणार आहे, त्यांनी माफी द्यायचे मान्य केले आहे. मग कशाला आमच्या डोक्यावर बसलाय? असे स्वत: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत म्हटल्याचे प्रताप होगाडे यांनी सांगितले.

साडेसतरा एचपीचा पंपच नाही, तर बिल कसे येतेसाडेसतरा एचपीचा पंपच बाजारात उपलब्ध नाही, तरीही महावितरणकडून साडेसतरा एचपी पंपाची बिले शेतकºयांना काढली असल्याचे प्रताप होगाडे यांनी निदर्शनास आणून देताना राज्यातील ४२ लाखांपैकी केवळ ३५ हजार पंपांचीच बिले व मीटर रीडिंग जुळत आहे. उर्वरित बिले अंदाजे काढली जात आहेत.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात आणि विशेष म्हणजे पंप आणि ट्रान्स्फॉर्मर काढून ठेवलेला असतानाही १२५ युनिटचे बिल शेतकऱ्याला येते. ३0 टक्के गळती असताना ती १५ टक्के दाखविली जाते. एक टक्का म्हणजे ७00 कोटी, असा हिशेब धरला, तर १0 हजार ५00 कोटींची बोगस बिले काढली जातात. ही तूट भरून काढण्यासाठी शेतकºयांची थकबाकी वाढविली जाते, हे सर्व ऊर्जा खात्यातील मंत्री, अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच होत असल्याचा आरोप प्रताप होगाडे यांनी केला.

 

 

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पkolhapurकोल्हापूर