शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कोल्हापूर : ‘ कलापूर एक्सप्रेस’ देशभरात आदर्श ठरेल : नलिनी भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:47 IST

ऐतिहासिक वारसा व निसर्ग सौदर्यांने नटलेल्या कोल्हापूरात खास वास्तवादी शैली आहे. त्यामुळे ‘कलापूर एक्सप्रेस ’ हा उपक्रम देशभरात आदर्शव्रत ठरेल. असा विश्वास ज्येष्ठ चित्रकार नलिनी भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

ठळक मुद्दे ‘ कलापूर एक्सप्रेस’ देशभरात आदर्श ठरेल : नलिनी भागवतल्वे स्टेशनच्या सौंदर्यीकरणासाठी आयोजित केलेल्या ‘कलापूर एक्सप्रेस’

कोल्हापूर : ऐतिहासिक वारसा व निसर्ग सौदर्यांने नटलेल्या कोल्हापूरात खास वास्तवादी शैली आहे. त्यामुळे ‘कलापूर एक्सप्रेस ’ हा उपक्रम देशभरात आदर्शव्रत ठरेल. असा विश्वास ज्येष्ठ चित्रकार नलिनी भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केला.त्या मध्य रेल्वे(पुणे विभाग)कॅम्लिन, एआयएसएएसएमएस यांच्यावतीने कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यीकरणासाठी आयोजित केलेल्या ‘कलापूर एक्सप्रेस’ या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होत्या.भागवत म्हणाल्या, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या कलानगरीत अनेक पर्यटन स्थळे, निसर्गाने नटलेला परिसर आणि समृद्ध चित्रकारांचा वारसा आदींमुळे वास्तववादी चित्र शैली आहे. त्या शैलीतून हा रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणाचा स्तुत्य उपक्रम आहे.ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव म्हणाले, जगभरातील पर्यटकांना भूरळ घालणारी कलानगरी आहे. त्यात निसर्गाने नटलेल्या शहराची व सांैदर्य स्थळांची जपणूक करणे गरजचे आहे. त्यात चित्रकार घडवणारी ही नगरी आहे. त्यामुळे हा उपक्रम देशात नव्हे तर परदेशातही गौरवणारा ठरेल. असा विश्वास व्यक्त केला.यानिमित्त ४० हून अधिक चित्रकारांची नोंदणी करण्यात आली व त्यांना रंगसाहित्यासह कॅनव्हासही देण्यात आला. येत्या तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणची चित्रे काढून घेण्यात येणार आहेत.

या माध्यमातून येथील ऐतिहासिक वारशांचा पुन्हा एकदा चित्ररूपात जतन केले जाणार आहे. पर्यटकांना कोल्हापूरची ओळख तर होईलच; पण स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी व पर्यटन वृद्धीसाठी मोठा फायदाही होणार आहे.मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य प्रबंधक कृष्णात पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमातील चित्रांमध्ये अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, पन्हाळा, जोतिबा, विशाळगड, पंचगंगा नदीघाट, साठमारी, गंगावेश, दूधकट्टा, शाहू जन्मस्थळ, खासबाग, कुस्ती मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, नवीन राजवाडा, टेंबलाई मंदिर, कात्यायनी, रंकाळा, रामलिंग, बाहुबली, नृसिंहवाडी, खिद्रापूर, मसाई पठार, पांडव लेणी, आदी पर्यटनस्थळांचा समावेश आहे.

प्रास्ताविक मोहन शेट्ये यांनी केले. यावेळी ज्येष्ठ चित्रकार के.आर. कुंभार, प्राचार्य अजेय दळवी, कॅम्लीन, कोकोयु कंपनीचे विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर अ‍ेझझा, मध्य रेल्वेचे वाणिज्य प्रबंधक एस.के.दास, चित्रकार प्रशांत जाधव, विजय टिपुगडे, आदी मान्यवर चित्रकार मंडळी उपस्थित होते. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकrailwayरेल्वेkolhapurकोल्हापूर