शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जे. पी. नाईक स्मारकस्थळी शैक्षणिक उपक्रम व्हावेत, जिल्हा परिषदेच्या सभेची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 17:34 IST

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या बहिरेवाडी (ता. आजरा) येथील स्मारकस्थळी शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या नुक त्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही या अनुषंगाने चर्चा झाली असून, यासाठी ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन काही आचारसंहिता करता येईल का, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

ठळक मुद्देजे. पी. नाईक स्मारकस्थळी शैक्षणिक उपक्रम व्हावेत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची अपेक्षा

कोल्हापूर :आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या बहिरेवाडी (ता. आजरा) येथील स्मारकस्थळी शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या नुक त्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही या अनुषंगाने चर्चा झाली असून, यासाठी ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन काही आचारसंहिता करता येईल का, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांतून हे भव्य स्मारक बहिरेवाडी येथे उभारण्यात आले असून, गेल्याच महिन्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमातही स्मारकस्थळावरील देखण्या इमारतीचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली होती.हाच धागा पकडून शाहूवाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य भगवान पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हे स्मारक पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत, या ठिकाणी जिल्हा परिषदेने शैक्षणिक उपक्रम घेण्याची मागणी केली होती.

यावेळी शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनीही एक चांगले स्मारक झाल्याची भावना व्यक्त करीत बहिरेवाडी ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन जिल्हा परिषदेमध्ये एक बैठक घेऊन या स्मारकस्थळी कार्यक्रम घेण्याबाबत एक आचारसंहिता तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.प्राथमिक, माध्यमिक आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीने वर्षभराचे नियोजन करून या ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करणे शक्य आहे. शिक्षकांच्या बैठका, मेळावे, प्रशिक्षणे, विविध पुरस्कारांचे वितरण असे शिक्षण क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम घेणे आवश्यक आहे.

आवश्यक साधनांची गरजअसे कार्यक्रम घेण्यासाठी आवश्यक ध्वनियंत्रणा, बैठक व्यवस्था यांचीही येथे सोय करणे आवश्यक आहे. सध्या केवळ दोनच सभागृहे येथे उपलब्ध असून, त्यांसाठीही पूरक यंत्रणा उभारण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर