शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Kolhapur: भाजपाविरोधात इंडिया आघाडी एकास एक उमेदवार देईल, पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 21:29 IST

Prithviraj Chavan: भ्रष्ट मोदी सरकारला पायउतार करण्यासाठी 2024 ची निवडणूक महत्वाची आहे. म्हणून भाजप विरोधात इंडिया आघाडी एकास एक उमेदवार देऊन मताची विभागणी टाळणार आहे.

- अतुल आंबीइचलकरंजी  - आगामी लोकसभा निवडणूक ठोकशाही विरुद्ध लोकशाही या मुद्द्यावर होईल. महागाई, बेरोजगारी, उद्योजक, शेतकऱ्यांचे प्रश्न, यामुळे जनता त्रस्त आहे. भ्रष्ट मोदी सरकारला पायउतार करण्यासाठी 2024 ची निवडणूक महत्वाची आहे. म्हणून भाजप विरोधात इंडिया आघाडी एकास एक उमेदवार देऊन मताची विभागणी टाळणार आहे. त्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरु असून त्याला नक्की यश मिळेल, असा विश्वास काँग्रेस चे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना व्यक्त केला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी, शिरोळ आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचा आढावा चव्हाण यांनी शनिवारी काँग्रेस समिती मध्ये घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. ते म्हणाले राज्यात इडी, सिबीआय या माध्यमातून ऑपरेशन कमळ राबवून ठोकशाहीच्या माध्यमातून दबावाचे राजकारण तसेच मंत्री पदाचे आमिष दाखवले जात आहे. यातून चाललेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. आता विचारांचे वारे निर्माण होत आहे. पेट्रोल डिझेल गॅसवर कर लावून हे सरकार देश चालवत आहे. देशाच्या मालमत्ता विकत आहेत. अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे आता लोकांनी भ्रष्ट मोदी सरकारची हकालपट्टी करायचं ठरवलं आहे. यावेळी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, पी एन पाटील, प्रदेश सचिव शशांक बावस्कर, राहुल खंजीरे, संजय कांबळे, मीना बेडगे, आदींचा काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पाणी सर्वांना मिळायला पाहिजेशहराच्या पाणी प्रश्नावर चव्हाण म्हणाले, पाणी सर्वांनाच मिळायला पाहिजे. त्यासाठी आपल्या शहराच्या योजनेसंदर्भात जिल्ह्यातील नेते एकत्र बसून नक्कीच तोडगा काढतील. 

बीआरएस पार्टी भाजपची बी टीमबीआरएस पार्टी भाजपची बी टीम असून त्यांना सर्व रसद भाजपकडून पुरवली जात असल्याचा घणाघात चव्हाण यांनी केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आटापिटा सुरु असताना काँग्रेसने त्यांना त्यांच्याच राज्यात रोखून धरले आहे. असेही त्यांनी सांगितले.

चव्हाण यांच्याकडे 2 मतदार संघाची जबाबदारीकाँग्रेसकडून 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी 24 जणांची टीम महाराष्ट्र राज्यात पाठवण्यात आली आहे. आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. आता केवळ आम्ही मित्रपक्ष, विरोधात कोण आहे, आमची ताकद किती आहे याचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेट्टी कधीही भाजप सोबत जाणार नाहीतमाजी खासदार राजू शेट्टी हे कधीही भाजप सोबत जाणार नाहीत असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. शेट्टी यांनी जातीवादी पक्षांना विरोध केला असल्याचे सांगून त्यांच्यासोबत महाविकास आघाडीची चर्चा चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाईलकर्नाटक पॅटर्न काँग्रेसने महाराष्ट्रात राबवला आहे. तिन्ही पक्ष एकत्रपणे भाजपला विरोध करणार आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्यानंतर मतदारसंघातील भावना पाहता पक्ष फुटला असला तरी जनता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने आहे. निवडणूकित ते दिसेल.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण