शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

कोल्हापुरातील ‘आयजी ऑफिस’ स्थलांतराच्या हालचाली गतिमान, सर्व विभागीय कार्यालये पुण्यात एकवटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 13:22 IST

गेली २७ वर्षांपासूनच हे कार्यालय पुण्यात हालविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे पुणे हे मुख्यालय आहे. तेथे सर्व विभागीय कार्यालयासह आयुक्तालये आहे. त्यादृष्टीने सोयीचे व्हावे यासाठी कोल्हापुरातील विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी ऑफीस) कार्यालय हे पुण्याला कायमचे स्थलांतरित करण्यासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत.पंधरा दिवसांपूर्वी राज्याच्या गृहविभागाने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करून त्याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. गेली २७ वर्षांपासूनच हे कार्यालय पुण्यात हालविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांच्या पोलीस खात्याचा कारभार या कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातून चालतो. सर्वसामान्य नागरिकांशी तसा या कार्यालयाचा फारसा थेट संपर्क येत नसला तरीही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून तक्रारींचे निवारण न झाल्यास त्याबाबत नागरिकांना थेट आयजी कार्यालयात दाद मागता येत होती.त्याशिवाय पाच जिल्ह्यांतील पोलीस दलाचे प्रशासकीय कामकाज याच कार्यालयातून चालते. पण हे कार्यालय कोल्हापुरात असणे म्हणजे कोल्हापूरच्या दृष्टीने भूषणवाह बाब आहे. पण आता हे कार्यालय पुण्यात स्थलांतरित करण्याच्या हालचाली १९९५ पासून सुरू आहेत. आता नुकतेच गृहविभागाने अहवाल मागविल्याने त्या हालचालींना वेग आला आहे.

‘क्राइम रेट’चाही विचारपरिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या दोन जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख (क्राइम रेट) वाढता असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भेटी देणे सोयीचे व्हावे. त्याशिवाय वरिष्ठ पातळीवरील होणाऱ्या बैठका यासाठी पुणे हेच ठिकाण सोयीचे असल्याने हे कार्यालय पुण्यात स्थलांतराच्या हालचाली सुरू आहेत.

बदलत्या परिस्थितीनुसार स्थलांतर

महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमाप्रश्नासाठी कोल्हापुरात १९६५ साली पाच जिल्ह्यांसाठी उपमहानिरीक्षक (डीआयजी) कार्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे रूपांतर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात (आयजी) करण्यात आले. पण आता बदलत्या परिस्थितीनुसार हे कार्यालय पुणे येथे सोयीचे ठरणार असल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आहे.

अहवाल मागितला, त्यानुसार कार्यवाही सुरू : जिल्हाधिकारीविशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्यात स्थलांतरित करण्याचा तसा जुनाच प्रस्ताव आहे. स्थलांतरित करण्याबाबत गृहखात्याने नुकताच अहवाल मागितला आहे. त्याबाबत अभ्यास करून अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. - राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसPuneपुणे