शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जलवाहिनीचे काम बुधवारपर्यंत न झाल्यास महापालिकेवर कारवाई : विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 16:16 IST

जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम बुधवार (दि. १०)पर्यंत पूर्ण न झाल्यास महापालिकेवर कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना शुक्रवारी येथे दिले.

ठळक मुद्देजलवाहिनीचे काम बुधवारपर्यंत न झाल्यास महापालिकेवर कारवाई विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पंचगंगा प्रदूषणप्रश्नी शिवसेना, प्रजासत्ताक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवेदन

कोल्हापूर : जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम बुधवार (दि. १०)पर्यंत पूर्ण न झाल्यास महापालिकेवर कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना शुक्रवारी येथे दिले.

पंचगंगा प्रदूषण या ज्वलंत विषयावर शिवसेना, प्रजासत्ताक सामाजिक संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर दळवी यांनी तातडीने हे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली.

यावेळी त्यांना शिवसेना, प्रजासत्ताक व स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी पंचगंगा प्रदूषणासंदर्भात निवेदन देऊन लक्ष वेधले. यानंतर त्यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दळवी म्हणाले, पंचगंगा प्रदूषण व जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाबाबत जिल्हाधिकारी व महापालिकेच्या आयुक्तांकडून माहिती घेतली आहे. आयुक्तांनी या कामासाठी ठेकेदार नेमला असून, बुधवार (दि. १०)पर्यंत हे काम पूर्ण करू, आश्वासन दिले आहे. या कामावर दररोज पर्यवेक्षण करून कामाचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.दिलेल्या वेळेत म्हणजे बुधवार (दि. १०)पर्यंत हे काम पूर्ण झाले नाही तर महापालिकेवर कारवाई करावी, असे आदेशही यावेळी विभागीय आयुक्तांनी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे हे काम पूर्ण झाले नाही तर कारवाई अटळ आहे.शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगा प्रदूषण रोखण्यास महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, इचलकरंजी मुख्याधिकारी यांना पूर्णपणे अपयश आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

वास्तविक जलप्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, सतीश कुरणे, आदींचा समावेश होता.‘प्रजासत्ताक’च्या दिलीप देसाई यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पंचगंगा प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेले महापालिकेचे आयुक्त, इचलकरंजीचे मुख्याधिकारी यांच्यावर क्रि. प्रो. को. कलम १३३ व पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ नुसार कारवाई करावी.‘स्वाभिमानी शेतकरी’कडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका व इचलकरंजी नगरपालिकेने सोडलेल्या सांडपाण्यामुळे हे पाणी शेतीसाठी योग्य राहिलेले नाही. यामुळे इचलकरंजी परिसरातील अनेक लोक काविळीसारख्या आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. याकडे गांभीर्याने न पाहिल्यास आंदोलन केले जाईल. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सागर शंभुशेटे, शैलेश चौगुले, सागर मादनाईक, आदींचा समावेश होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त