पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज : राजेंद्रसिंह

By admin | Published: February 4, 2017 12:02 AM2017-02-04T00:02:08+5:302017-02-04T00:02:08+5:30

प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत मार्गदर्शन

The need for stringent law to stop Panchganga pollution: Rajendra Singh | पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज : राजेंद्रसिंह

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज : राजेंद्रसिंह

Next


कोल्हापूर : ‘शहराची जीवनदायिनी’ असणाऱ्या पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विशेष धोरण ठरवून कडक कायदा करायला हवा व त्याची अंमलबजावणीदेखील काटेकोरपणे व्हायला हवी, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ
डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत मार्गदर्शन करण्यासाठी ते कोल्हापुरात आले होते.

डॉ. राणा म्हणाले, कोल्हापूर हा देशातील सर्वाधिक नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संपन्नता असलेला जिल्हा आहे. येथील संपन्नतेबरोबरच काही चुकीच्या गोष्टी ही येथे आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या जलस्रोतांचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला. त्यामुळे जिल्ह्यातील ७०० हेक्टर जमीन क्षारपड बनली आहे.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे जलशुद्धिकरण प्रकल्पासारखी तात्पुरती उपाययोजना कामाची नाही. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने आराखडा तयार करायला हवा व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी.


कोल्हापूरचे मानवी व नैसर्गिक आरोग्य यांची सांगड घालीत विकासाचे नियोजन केल्यास पंचगंगेसारखी नदी प्रदूषणमुक्त करता येईलच; त्यासह मानवी आरोग्याचा दर्जाही वाढविता येईल. यासाठी जनजागृतीबरोबरच शासकीय स्तरावर प्रयत्न गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला डॉ. एम. एम. अली, डॉ. ए. आर. कुलकर्णी, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, आदी उपस्थित होते.


डॉ. राणा म्हणाले
नदीपात्राच्या दोन्ही बाजूस पाच किलोमीटरपर्यंत सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करायला हवा.
नदीला आपण माता म्हणतो, मग तिचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी
राज्यात सर्वाधिक धरणे असूनही जलनियोजनाकडे दुर्लक्ष झाले
अर्थसंकल्पात कृषिक्षेत्राकडे अधिक लक्ष द्यायला हवे
लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजना यशस्वी; परंतु ठेकेदारांमुळे योजनेवर प्रश्नचिन्ह
मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर व अधिक गुंतागुंतीचा,भयानक बनत चालला आहे.
नदीजोड प्रकल्प देशासाठी अहिताचा

कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात शुक्रवारी प्रा. डॉ. ए. डी. शिंदे स्मृती व्याख्यानमालेत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: The need for stringent law to stop Panchganga pollution: Rajendra Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.