शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दीपोत्सवाने उजळला पन्हाळगड; मावळ्यांनी सादर केली मर्दानी खेळ, तलवारबाजीची प्रात्यक्षिके -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 15:14 IST

कोल्हापूर हायकर्सतर्फे आयोजन; सलग तेरा वर्षे उपक्रम 

पन्हाळा: कोल्हापूर हायकर्सतर्फे पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी मंदिर व सज्जा कोठी या ठिकाणी दीपावलीनिमित्त सलग तेराव्या वर्षी इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या हस्ते व दीपोत्सवाचा शुभारंभ युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते शिव मंदिराचे पूजन करून व पहिला दिवा शिवरायांच्या चरणी अर्पण करून करण्यात आला. यावेळी पन्हाळ्याचे मुख्याधिकारी चेतन कुमार-माळी, शिवप्रेमी उपस्थित होते.  सर्व जण दिवाळी नेहमी घरात साजरी करतात; पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला. त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. नेमके हेच हेरून कोल्हापूर हायकर्सतर्फे गेल्या बारा वर्षांपासून पन्हाळा गडावर वसुबारसेच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. या परिवारातर्फे २०१३ पासून सुरू केलेला 'एक सांज पन्हाळगडावर' हा अनोखा उपक्रम यंदा सलग तेराव्या वर्षी यशस्वीरीत्या संपन्न झाला.वर्षभर गड किल्ल्यावर दुर्ग संवर्धन व पदभ्रमंती तसेच विविध साहसी क्रीडा प्रकार आयोजित करणाऱ्या तरुणांचा ग्रुप अशी कोल्हापूर हायकर्सची ओळख आहे. किल्ल्यांचे महत्त्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचावे, यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. जुन्या बुधवारातील शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण केंद्राच्या मर्दानी आखाड्याच्या मावळ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळ व तलवारबाजीची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी इंद्रजित सावंत यांनी पन्हाळगडाचा अभ्यास पूर्ण इतिहास मांडला.दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर हायकर्सच्या सर्व सदस्यांसह अध्यक्ष सागर श्रीकांत पाटील, श्रावणी पाटील, सूर्यकांत देशमुख, इंद्रजित मोरे, विजय ससे, सेजल जाधव, समर्थ जाधव, शुभम घनतडे, प्रतीक कांबळे, प्रतीक्षा कांबळे, वृषाली मगदूम, नूतन पाटील, सागर पाटील, अवंती राजहंस, हनिफ नगारजी यांनी परिश्रम घेतले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Panhalgad Fort illuminated with Diwali lights by Kolhapur Hikers.

Web Summary : Kolhapur Hikers celebrated a unique Diwali festival at Panhalgad for the thirteenth year. The event, initiated in 2013, aims to highlight the fort's historical significance and was inaugurated by historian Indrajit Sawant and Yuvarajni Sanyogitaraje Sambhajiraje Chhatrapati.