शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

ऊसदरात ‘गुजरात’ला कोल्हापूर भारी : ‘बिद्री’ साखर कारखान्याचा दर ‘गणदेवी’च्या बरोबरीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:39 AM

ऊसदराचे आंदोलन पेटले की सगळेजण गुजरातमधील साखर कारखान्यांच्या ऊसदराकडे बोट करतात; पण गेल्या २०१७-१८ या हंगामात गुजरातमधील कारखान्यांपेक्षा कोल्हापुरातील कारखान्यांनीच अधिक दर दिला आहे

कोल्हापूर : ऊसदराचे आंदोलन पेटले की सगळेजण गुजरातमधील साखर कारखान्यांच्या ऊसदराकडे बोट करतात; पण गेल्या २०१७-१८ या हंगामात गुजरातमधील कारखान्यांपेक्षा कोल्हापुरातील कारखान्यांनीच अधिक दर दिला आहे. गुजरातमधील ज्या कारखान्याचा देशभर गवगवा केला जातो, त्या ‘गणदेवी’ कारखान्याने ३१०५ रुपये दर दिला असून, सर्वांत कमी ‘कनथा’ कारखान्याने २०२० रुपये अंतिम दर दिला आहे.

महाराष्ट्रात ऊसदराचा प्रश्न वर्षभर राहतो. हंगामाच्या अगोदर महिना-दीड महिना शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती सुरू राहते आणि ऊस परिषदेच्या माध्यमातून दराच्या आकड्याची घोषणा केली जाते. त्यानंतर दरावरून आंदोलन भडकते आणि सारा महाराष्टÑ धगधगत राहतो. गुजरातमधील साखर कारखाने दर देतात; मग महाराष्टÑातील का नाही? असा सवालही केला जातो. शेतकरी संघटनेचा या आरोपात काही प्रमाणात तथ्य आहे.

गुजरातमधील कारखान्यांनी २०१६-१७ या हंगामात शेतकºयांना सरासरी ३५०० रुपयांच्या वर दर दिला. ‘गणदेवी’ कारखान्याने या हंगामात ४४४१ रुपये प्रतिटन दर दिला; पण गेल्या हंगामात (२०१७-१८) साखरेच्या कोसळलेल्या दराने या कारखान्यांना ३००० रुपये दर देताना दमछाक उडाली. ‘गणदेवी’ कारखान्याने ३१०५ रुपये दर दिला, तर उर्वरित कारखान्यांचे दर २०२० पासून २८३२ रुपयांपर्यंत राहिले. त्याचवेळी कोल्हापुरातील कारखान्यांनी सरासरी तीन हजार रुपये दर देऊन ‘गणदेवी’शी बरोबरी साधली. सर्वाधिक दर बिद्री (ता. कागल)च्या दूधगंगा-वेदगंगा कारखान्याने ३१०० रुपये दिला. त्यामुळे दराच्या तुलनेत कोल्हापूरच भारी ठरल्याचे दिसते.गुजरात व कोल्हापुरातील गत हंगामांतील ऊसदर असा -गुजरात २०१६-१७ २०१७-१८ कोल्हापूर २०१६-१७ २०१७-१८गणदेवी ४४४१ ३१०५ दत्त-शिरोळ ३११५ ३०२५बारडोली ३९५४ २८३२ जवाहर ३१२५ ३०७५चलथान ३८५६ २७३६ गुरुदत्त ३१४८ ३०५४माधी ३५०४ २६११ शाहू-कागल ३१२५ ३०३२मेहुवा ३१०७ २४५१ हमीदवाडा ३००० ३०५०सायन ३७०५ २७४१ बिद्री ३००१ ३१००कामराज ३५०६ २४०६ कुंभी ३०६० ३०००गुजरातचा दर जादा हवाचकोल्हापुरातील कारखाने सभासदांना सवलतीच्या दरात महिन्याला साखर व इतर सुविधा देतात. गुजरातमधील कारखाने त्या देत नाहीत. तुलनेने गुजरातच्या साखरेला प्रतिक्विंटल १५० रुपये जादा दर मिळत असल्याने कोल्हापूरच्या तुलनेत गुजरातचा दर किमान प्रतिक्विंटल ५०० रुपये जादा असायलाच पाहिजे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरGujaratगुजरात