शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर तापले, पारा ३६ अंश सेल्सिअसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:06 IST

Temperature Kolhapur- मार्च महिन्याचा पहिला दिवस कोल्हापूरकरांसाठी अंग भाजून काढणारा आणि आगामी उन्हाळ्याची दाहकता दाखविणारा ठरला. आतापर्यंत ३० ते ३२ अंशांवर असणारा तापमानाचा पारा सोमवारी अचानक ३६ अंशांवर गेल्याने कोल्हापूरकरांना उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागला.

ठळक मुद्देकोल्हापूर तापले, पारा ३६ अंश सेल्सिअसवर

कोल्हापूर : मार्च महिन्याचा पहिला दिवस कोल्हापूरकरांसाठी अंग भाजून काढणारा आणि आगामी उन्हाळ्याची दाहकता दाखविणारा ठरला. आतापर्यंत ३० ते ३२ अंशांवर असणारा तापमानाचा पारा सोमवारी अचानक ३६ अंशांवर गेल्याने कोल्हापूरकरांना उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागला.गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल जाणवत असून, थंडीपासून उन्हाळ्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. रात्रीचे तापमान कमी जास्त होत आहे. सकाळी मात्र आल्हाददायक गारवा असतो. शनिवार, रविवारी अधेमध्ये ढगाळ वातावरणही होत होते. सोमवारी दिवसभर आभाळ पूर्ण निरभ्र झाले. परत पाच वाजल्यापासून ढगाळ वातावरण सुरू असल्याने वातावरण कोंदट झाले.कोल्हापुरात रात्रीचे तापमान कमाल २४ अंशांवर गेले आहे. दिवसाचे तापमानही २७ वरून वाढत जाऊन ते दुपारी १२ वाजता ३५ अंशांपर्यंत गेले. दुपारी एक ते तीन या दरम्यान, तर पारा ३६ अंशांवर पोहोचल्याने कडक उन्हामुळे जिवाची काहिली होत होती. थंडाव्यासाठी प्रत्येकजण सावलीचा आडोसा शोधताना दिसत होता. डोके तापत असल्याने डोक्यावर कापड गुंडाळून घेतले जात होते. तहान शमविण्यासाठी सरबत, कलिंगड, आइस्क्रीम विक्रीच्या दुकानांकडे पावले वळत होती.

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर