कोल्हापूर : पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी ९ जुलैला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 16:51 IST2018-06-05T16:51:06+5:302018-06-05T16:51:06+5:30
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी मंगळवारी होणारी सुनावणी दि. ९ जुलैला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुरू आहे.

कोल्हापूर : पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी ९ जुलैला
ठळक मुद्दे पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी ९ जुलैलासमीर गायकवाड सुनावणीला हजर
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी मंगळवारी होणारी सुनावणी दि. ९ जुलैला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुरू आहे.
विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे, संशयित आरोपी समीर गायकवाड सुनावणीला हजर होते. सुनावणी लांबणीवर पडल्याने संशयित गायकवाड माघारी सांगली येथे निघून गेला.
त्याचे वकील समीर पटवर्धन हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुणे येथील न्यायालयात सुनावणीसाठी गेले होते.