शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘डीएसकें’च्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी, ३०० तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 14:20 IST

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके ग्रुपचे मालक डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या, शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्दे‘डीएसकें’च्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी, ३०० तक्रारी दाखल मुंबई, पुण्यासह कोल्हापूर सांगली, सोलापूरमधील ५०० मालमत्ता सील

कोल्हापूर : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके ग्रुपचे मालक डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या, शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.

कोल्हापूर पोलिसांनी डीएसकेच्या कोल्हापुरातील टोप-संभापूर, सांगलीतील मालगांव व सोलापूर तर पुणे पोलिसांनी पुणेसह मुंबई येथील ५०० मालमत्ता सील केल्या आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत ३०० गुंतवणूकदारांचे जबाब घेतले असून फसवणुकीचा आकडा १९ कोटींपर्यंत गेला आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी दिली.ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके ग्रुपवर पुणे, मुंबईत गुन्हे दाखल झाले आहेत. कोल्हापूर शहरासह, ग्रामीण भागातील शेतकरी, सेवानिवृत्त शिक्षक, व्यापारी व इतर व्यवसायांतील ६०० गुंतवणूकदारांनी एक लाखापासून ते १० कोटी अशा सुमारे दोनशे कोटींच्या ठेवी ‘डीएसके’मध्ये ठेवल्या असल्याची चर्चा आहे.

आतापर्यंत कोल्हापुरातील तीनशे गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दाखल केले. या गुन्ह्यांमध्ये ठेवीदार असोसिएशनचे अध्यक्ष बी. डी. किल्लेदार यांची मुख्य तक्रार आहे. या गुन्ह्यात फसवणूक झालेल्या २९९ गुंतवणूकदारांना साक्षीदार केले आहे.

या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. या गुन्ह्यांचा पुणे व मुंबई पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत. महाराष्ट्र सुरक्षा गुंतवणूकदार अधिनियम कायद्यानुसार ‘डीएसके ग्रुप’च्या पुणे व मुंबई, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील ५०० स्थावर मालमत्ता सील केल्या आहेत.

सध्या डीएसके दाम्पत्य येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी हा २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहे. या तिघांचा ताबा कोल्हापूर पोलीस घेणार आहे. येथून अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी त्यांच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर २९ जूनला सुनावणी होणार आहे.

अटकपूर्व जामीन फेटाळावा म्हणून जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल सरकार पक्षातर्फे बाजू मांडणार आहेत. ‘डीएसके’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे, ती शासनाने लिलावात काढल्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे. 

 

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीfraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूर