डी. एस. कुलकर्णी यांची आॅडी कार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 08:36 PM2018-02-28T20:36:06+5:302018-02-28T20:36:06+5:30

आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ताफ्यातील ५० लाख रुपयांची आॅडी ही कार जप्त केली. यापूर्वी त्यांच्या ६ आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या.

D. S. Kulkarni's Audi car seized | डी. एस. कुलकर्णी यांची आॅडी कार जप्त

डी. एस. कुलकर्णी यांची आॅडी कार जप्त

Next

पुणे : आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ताफ्यातील ५० लाख रुपयांची आॅडी ही कार जप्त केली. यापूर्वी त्यांच्या ६ आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या.  डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे बुधवारीही पोलिसांची चौकशी सुरू होती. आता आपली यातून सुटका नसल्याची जाणीव झाल्याने त्यांच्याकडून पोलिसांना सहकार्य मिळू लागले आहे. पोलीस डीएसके यांना बुधवारी त्यांच्या कार्यालयात घेऊन जाऊन दिवसभर कागदपत्रांची तपासणी करीत होते. तपासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.

डीएसके व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना न्यायालयाने गेल्या शुक्रवारी १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. यापूर्वी उच्च न्यायालयाने पोलिसांकडे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी त्यांच्याकडून तपासासाठी पोलिसांना सहकार्य मिळाले नव्हते. गेल्या सात दिवसात पोलिसांना त्यांनी तपासात सहकार्य करण्यास सुरुवात केली असली तरी अजूनही ठेवीदार व फ्लॅटधारकांचा पैसा कोठे वळविला, याची पुरेशी माहिती त्यांच्याकडून पोलिसांना मिळालेली नाही. आता मात्र ते सहकार्य करू लागले आहेत. या सात दिवसात डीएसके यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना दररोज वैद्यकीय तपासणीसाठी नेणे, आणणे यात तपासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. 

या गुन्ह्याचा आवाका मोठा असल्याने ही पोलीस कोठडी पुरेशी नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुरुवारी न्यायालयात पोलिसांकडून पोलीस कोठडी वाढू मिळावी, यासाठी विनंती केली जाण्याची शक्यता आहे. डीएसके यांच्या वकिलांकडून त्याला विरोध केला जाईल. त्याचवेळी डीएसके यांच्याविरुद्ध कोल्हापूर आणि मुंबईतही गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनीही आपल्याला पोलीस कोठडी मिळाली अशी विनंती न्यायालयात केली आहे. न्यायालयाने गुरुवारी पुणे पोलिसांना पोलीस कोठडी वाढून दिली नाही तर, कोल्हापूर अथवा मुंबई पोलिसांकडून त्यांना तपासासाठी आपल्या ताब्यात द्यावे, अशी विनंती केली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: D. S. Kulkarni's Audi car seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.