शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : झीप क्वाईनचा प्रारंभ राहुल रॉयच्या हस्ते, पोलीस तपासात निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 11:59 IST

झीप क्वाईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या या कंपनीचा प्रारंभ मुंबईत सिने अभिनेता राहुल रॉय याच्या हस्ते करण्यात आल्याची कबुली तिघा भामट्यांनी दिली आहे. या कार्यक्रमास उद्योगपती, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांना निमंत्रित केले होते.

ठळक मुद्देझीप क्वाईनचा प्रारंभ राहुल रॉयच्या हस्ते, पोलीस तपासात निष्पन्न झीप क्वाईन क्रिप्टो करन्सी फसवणूक प्रकरणमुख्य सूत्रधार बालाजी गणगेचा शोध सुरू

कोल्हापूर : झीप क्वाईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या या कंपनीचा प्रारंभ मुंबईत सिने अभिनेता राहुल रॉय याच्या हस्ते करण्यात आल्याची कबुली तिघा भामट्यांनी दिली आहे. या कार्यक्रमास उद्योगपती, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांना निमंत्रित केले होते.दरम्यान, संशयित राजेंद्र नेर्लेकर, त्याचा भाऊ अनिल व संजय कुंभार या तिघा भामट्यांच्या विरोधात आतापर्यंत चौदा तक्रारी दाखल झाल्या असून फसवणुकीचा आकडा दोन कोटींपर्यंत गेला आहे. या भामट्यांनी सुमारे दीडशे कोटींची फसवणूक केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बालाजी गणगे (रा. पुणे) याचा कसोशीने शोध सुरू आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.चार दिवसांपूर्वी झीप क्वाईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश कोल्हापूर पोलिसांनी केला. या प्रकरणी संशयित राजेंद्र नेर्लेकर, त्याचा भाऊ अनिल व संजय तमन्ना कुंभार हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या झीप क्वाईनच्या प्रारंभ कार्यक्रमास अभिनेता राहुल रॉयला निमंत्रित केले होते, अशी कबुली त्यांनी दिली. त्यांचा मुख्य सूत्रधार संशयित बालाजी गणगे आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या संगणकाचा पासवर्ड गणगे याला माहीत आहे. तो शोधून काढण्यासाठी शुक्रवारी सायबर तज्ज्ञांनी मेहनत घेतली. मात्र तो उघडता आला नाही. राजेंद्र नेर्लेकर याची पत्नी पद्मा, मुलगा बालाजी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी त्यांना अटक दाखविण्याची शक्यता आहे.राजेंद्र नेर्लेकर याची आलिशान कार दुरुस्तीच्या कामानिमित्त पुणे येथील गॅरेजमध्ये आहे. येथील गॅरेजच्या व्यवस्थापनाशी कार पोलिसांच्या ताब्यात द्यावी, असा पत्रव्यवहार केला आहे. कुंभार याने आलिशान कार दुसऱ्याला विकली आहे. ती फसवणुकीच्या गुन्ह्यातील पैशातून खरेदी केली आहे काय, याची चौकशी करून तसे आढळल्यास कार जप्त केली जाणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.

 

टॅग्स :Rahul Royराहुल रॉयCrimeगुन्हाkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस