शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कोल्हापूर : सरकारी कर्मचारी रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानिदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:12 PM

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानिदर्शने करून निषेध नोंदविला. मागण्या मान्य न झाल्यास आॅगस्ट महिन्यात लाक्षणिक संपाचाही इशारा यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देशासनाच्या निषेधार्थ सरकारी कर्मचारी रस्त्यावरजिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानिदर्शने

कोल्हापूर : अंशदायी पेन्शन योजना रद्द करून नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांबाबत दिलेली आश्वासने शासनाने पाळलेली नाहीत, असा आरोप करत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानिदर्शने करून निषेध नोंदविला. मागण्या मान्य न झाल्यास आॅगस्ट महिन्यात लाक्षणिक संपाचाही इशारा यावेळी देण्यात आला.दुपारी दीडच्या सुमारास जेवणाच्या सुटीत जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी या ठिकाणी एकवटले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत महाआक्रोश आंदोलन व महानिदर्शने करण्यात आली. घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यानंतर संघटनेचे सहसचिव अनिल लवेकर, जिल्हाध्यक्ष वसंत डावरे, महसूल कर्मचारी संघटनेचे विलास कुरणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.अंशदायी पेन्शन योजना रद्द करून नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू करावी, १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग यापुढे तातडीने लागू करावा, खासगीकरण व कंत्राटीकरण रद्द करावे, सध्या कंत्राटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावे, पाच दिवसांचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० करावे, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करावी, सर्व रिक्त पदे त्वरित भरावी, अनुकंपा भरती विनाअट सुरू करावी, अशा मागण्या गेली चार वर्षे शासनाकडे प्रलंबित आहेत.त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.आंदोलनात संजय क्षीरसागर, सुनील देसाई, के. एम. बागवान, संदीप पाटील, अमित लाड, हाशमत हावेरी, विनायक लुगडे, शंकर गुरव, अमर पाटील, दगडू घोसाळकर, रमेश भोसले, संजीवनी दळवी, विलास काळे, अमोल बोलाईकर, मानसी शेंडे, मंगला इसापुरे, राणी घावरी, वैजयंती कांबळे, अंजली देवरकर, आदी सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी