कोल्हापूर : माउली चौकातील जागा ‘केएमटी’ला कायमस्वरूपी द्या : महापालिका परिवहन सभापतींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 13:15 IST2018-07-07T13:08:12+5:302018-07-07T13:15:23+5:30
राजारामपुरी माउली चौक येथील के. एम. टी.च्या ताब्यात असलेली जागा ‘बस टर्मिनल’ विकसित करण्यासाठी कायमस्वरूपी ताब्यात द्यावी, या मागणीचे निवेदन महापालिका परिवहन सभापती राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सादर केले.

राजारामपुरी माउली चौकातील जागा ‘केएमटी’ला कायमस्वरूपी द्यावी, या मागणीचे निवेदन महापालिकेचे परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले. यावेळी समिती सदस्य उपस्थित होते.
कोल्हापूर : राजारामपुरी माउली चौक येथील के. एम. टी.च्या ताब्यात असलेली जागा ‘बस टर्मिनल’ विकसित करण्यासाठी कायमस्वरूपी ताब्यात द्यावी, या मागणीचे निवेदन महापालिका परिवहन सभापती राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, राजारामपुरी माउली चौक येथील शासनाची जागा ‘टीपी’योजनेतून सन २००२ मध्ये ‘केएमटी’ला हस्तांतरित झाली आहे. या जागेचा आगाऊ ताबा ‘केएमटी’कडे आहे. या जागेवर ‘बस टर्मिनल’ विकसित करण्यासाठी परिवहन समितीच्या बैठकीमध्ये वारंवार चर्चा केली जाते. त्यास अनुसरून ही जागा कायम मालकी हक्काने मिळावी.
यावर ही जागा कायम मालकी हक्काने देण्याबाबतच प्रस्ताव राज्य शासनाकडे लवकरात लवकर पाठविला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
शिष्टमंडळात नगरसेवक शेखर कुसाळे, परिवहन समिती सदस्य चंद्रकांत सूर्यवंशी, संतोष गायकवाड, दीपक शेळके, शोभा कवाळे, आदींचा समावेश होता.