शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अपात्र कर्जमाफीचे व्याज देणार, एकरी पन्नास हजार पीककर्ज द्या: हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:39 IST

केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी व्याजासह परत मिळावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणात विकास संस्थांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक संस्था अनिष्ट दुराव्यात गेल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हा बॅँकेची सर्वसाधारण सभा-संचालक मंडळ माझ्यासोबत माझ्यावर ‘अविश्वास’ या जन्मात अशक्य! : हसन मुश्रीफ

 कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी व्याजासह परत मिळावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणात विकास संस्थांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक संस्था अनिष्ट दुराव्यात गेल्या आहेत. जर न्यायालयाने व्याजाची रक्कम दिली नाही तर ती देण्यासाठी बँक तरतूद करेल, अशी ग्वाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.

व्यवसाय वृद्धीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार असून, त्यामध्ये यशस्वी झालो तर पुढील वर्षी संस्थांना १२ टक्के लाभांश देऊ, असेही त्यांनी सांगितले.जिल्हा बँकेची ८० वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी शाहू सांस्कृतिक मंदिर, शाहू मार्केट यार्ड येथेझाली.त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मुश्रीफ बोलत होते.

ते म्हणाले, अपात्र कर्जमाफी व नोटाबंदीतून मार्ग काढत अपात्र कर्जमाफीविरोधात सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू असून, २२ आॅक्टोबरला अंतिम निर्णय होईल. अपात्र ११२ कोटी असले तरी गेल्या सहा वर्षांत व्याजाची रक्कमही तेवढीच झाली आहे. मेंबर पातळीवरून ही रक्कम वसूल झालेली नाही; पण बँकेने विकास संस्थांकडून वसूल केल्याने संस्था आर्थिक अडचणीत आल्या. त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी बँकेची आहे.

न्यायालयाने अपात्र रक्कम व्याजासह देण्यास सांगितले तर ‘नाबार्ड’कडून ती वसूल करता येईल; पण त्यांनी नाही दिले तर बँकेच्या नफ्यातून व्याजाची तरतूद केली जाईल. नोटाबंदीतील अजूनही २५ कोटी रिझर्व्ह बँकेने स्वीकारलेले नाहीत. अडचणीतील साखर कारखान्यांना मदत करत असताना ठेवीसह एकूणच व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी मार्केटिंग गतिमान करणार आहे.

साखर कारखान्यांकडून आलेला भरणा चालू अथवा सेव्हिंग खात्यावर पंधरा ते तीन आठवडे तसाच पडून राहतो. त्यामुळे संस्थांना व्याजाचा फटका बसत असल्याची तक्रार रंगराव चिमणे यांच्यासह इतरांनी केली. यावर रकमा ज्या त्यावेळी वर्ग केल्या जातात. तसे आढळल्यास संबंधिताला तत्काळ निलंबित केले जाईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेसाठी एन. ए. प्लॉटची अट आहे ती शिथील करावी, अशी मागणी तानाजी चौगले (सोळांकूर) यांनी केली. पीक कर्ज एकरी ५० हजार रुपये द्यावे, अशी मागणी माणिक पाटील (चुये) यांनी केली. १७ टक्के लाभांश द्या, असे अशोकराव पवार यांनी सूचित केले.

दोनशेवरून तीनशे कोटी अधिकृत भागभांडवल, प्रवेश शुल्क शंभरावरून पाचशे, भागाचा दाखला हवा असल्याने शंभरऐवजी पाचशे रुपये घेण्याबाबत पोटनियम दुरुस्तीस मान्यता देण्यात आली.यावेळी अपात्र ११२ कोटींसाठी लढाई दिल्याबद्दल विकास संस्थांच्यावतीने मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. सुरेश पाटील, अ‍ॅड. विजयसिंह पाटील यांच्यासह बहुतांशी संस्था प्रतिनिधींनी अभिनंदन केले.

अहवाल वाचन बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले. उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ संचालक पी. एन. पाटील, निवेदिता माने, पी. जी. शिंदे, अधिकारी, सभासद उपस्थित होते.माझ्यावर ‘अविश्वास’ या जन्मात अशक्य!  हसन मुश्रीफ : संचालक मंडळ माझ्यासोबतकोल्हापूर : गेले दोन-तीन दिवस जिल्हा बॅँकेच्या सत्तेबाबत चर्चा सुरू आहे; पण बॅँकेचे सगळे संचालक माझ्या मागे उभे आहेत. मला बदलायचे झाले तर मी राजीनामा दिला पाहिजे; अन्यथा दोन तृतीयांश संचालकांनी बदलण्याची मागणी करून अविश्वास ठराव आणला पाहिजे. ते या जन्मात अशक्य आहे, असे आव्हान जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी महादेवराव महाडिक यांना दिले.‘गोकुळ’ मल्टिस्टेटवरून माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ‘माझ्या एका उडीची गरज आहे. जिल्हा बॅँकेत सत्तांतर होण्यास वेळ लागणार नाही,’ असा इशारा महाडिक यांनी दिला होता. त्याला जिल्हा बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले.मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात जिल्हा बॅँकेच्या सत्तांतराबाबत चर्चा सुरू आहे; पण बॅँकेचे सगळे संचालक माझ्या पाठीशी आहेत. ते ज्यावेळी सांगतील त्यावेळी क्षणात पायउतार होईन. बॅँकेची अध्यक्ष निवड वर्षाला होत नाही; त्यामुळे एक तर मी राजीनामा दिला पाहिजे किंवा माझ्यावर अविश्वास ठराव आणला पाहिजे. कठीण काळातून आपण बॅँकेला गतवैभव मिळवून दिले आणि आगामी काळात देशातील नंबर वनची बॅँक करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.मुश्रीफ यांनाच ‘दिल्ली’त पाठवाथकबाकीदार संस्थांना मतदानाचा अधिकार द्या, अशी मागणी प्रा. किसन कुराडे यांनी केली; पण ९७ व्या घटनादुरुस्तीने ते शक्य नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगताच ‘पुन्हा घटनादुरुस्तीसाठी मुश्रीफ यांना दिल्लीत पाठवा,’ असे के. पी. पाटील यांनी सांगितले. यावर ‘मला दिल्लीत घालवून हे मंत्री व्हायला मोकळे झाले!’ असा टोला लगावत‘पी. एन. पाटील उभे राहतात का विचारा!’ असे मुश्रीफांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणFarmerशेतकरीbankबँक