शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : झीपक्वॉईन फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणगे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 13:30 IST

झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील पसार व संशयित मुख्य सूत्रधार बालाजी गणगे (रा. पुणे) याच्या पुण्यातील निवासस्थानावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून झाडाझडती घेतली; पण, तो मिळाला नाही. या फसवणुकीची व्याप्ती मोठी असून आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सुमारे दोन कोटींची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.

ठळक मुद्दे झीपक्वॉईन फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणगे पसार पुण्यातील घराची झडती, कोल्हापूर गुन्हे अन्वेषणची कारवाई

कोल्हापूर : झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील पसार व संशयित मुख्य सूत्रधार बालाजी गणगे (रा. पुणे) याच्या पुण्यातील निवासस्थानावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून झाडाझडती घेतली; पण, तो मिळाला नाही.

या फसवणुकीची व्याप्ती मोठी असून आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सुमारे दोन कोटींची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. ‘झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सी’ या डिजीटल कंपनीची सुरुवात मुंबईतून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

चार दिवसांपूर्वी झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकीच्या फसवणूक प्रकरणाचा पर्दापाश कोल्हापूर पोलिसांनी केला. या प्रकरणी संशयित राजेंद्र नेर्लेकर, त्याचा भाऊ अनिल व संजय तमन्ना कुंभार हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्याचा मुख्य सूत्रधार संशयित बालाजी गणगे असल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी पुण्यातील त्याच्या निवासस्थानावर छापा टाकून झाडाझडती घेतली.

संशयित राजेंद्र नेर्लेकर हा ग्राहक आणत असे तर त्याचा भाऊ अनिल रकमेचे आॅनलाईन व्यवहार करत. संजय कुंभार हा कंपनीचे व्यवस्थापन पाहत. पोलिसांनी संशयितांचे रेकॉर्ड जप्त केले आहे तसेच त्यांच्याकडून संगणकही जप्त केला आहे. पण, संगणकाचा पासवर्ड माहीत नसल्याने त्या संगणकामधील माहिती पोलिसांना मिळालेली नाही.

त्यामुळे सायबर क्राईम सेलकडून त्याचा पासवर्ड काढण्याचे काम सुरू आहे. पासवर्ड निघाल्यास संगणकातील डाटा पोलिसांना उपलब्ध होणार आहे. राजेंद्र नेर्लेकर याची पत्नी पद्मा, मुलगा बालाजी यांच्याकडे पोलीस चौकशी करत आहे.दरम्यान, संशयित राजेंद्र नेर्लेकर, संजय कुंभार व बालाजी गणगे या तिघांनी भागीदारीमध्ये ही कंपनी काढली. त्याचा शुभारंभ मुंबईत त्यांनी केला. या शुभारंभावेळी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केल्याचीही माहिती तपासात पुढे येत आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हाPoliceपोलिस