संतोष ट्रॉफी राज्य संघात कोल्हापूरच्या चौघांची वर्णी

By सचिन भोसले | Updated: October 5, 2023 22:47 IST2023-10-05T22:47:01+5:302023-10-05T22:47:50+5:30

- फुटबॉल फॉर स्कूल अंतर्गत फिफा राज्यात १५ लाख फुटबॉल वाटणार

kolhapur four player name in santosh trophy state team | संतोष ट्रॉफी राज्य संघात कोल्हापूरच्या चौघांची वर्णी

संतोष ट्रॉफी राज्य संघात कोल्हापूरच्या चौघांची वर्णी

सचिन भोसले, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात कोल्हापूरच्या पवन माळी, संकेत साळुंखे,निखिल कदम, अरबाज पेंढारी या चौघांची गुरुवारी रात्री निवड झाली.

संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेतील एफ गटातील एकूण पंधरा सामने कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर १३ ऑक्टोंबर पासून होणार आहेत. यात यजमान महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, लक्षद्वीप, अंदमान निकोबार, त्रिपुरा या संघांचा समावेश आहे. सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेतील एका गटातील सामने फिफाचे आर्थिक समितीचे उपाध्यक्ष व विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे व मधुरीमाराजे यांच्या प्रयत्नातून होत आहे. दुग्ध शर्करा योग म्हणजे महाराष्ट्र राज्य संघात कोल्हापूरच्या या चौघांचा ही समावेश आहे. चौघेही स्थानिक संघातून खेळत आहेत.

फुटबॉल फॉर स्कूल अंतर्गत फिफा राज्यात १५ लाख फुटबॉल वाटप 

फिफाने प्रथमच महाराष्ट्र राज्यात फुटबॉल फॉर स्कूल या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांना एकूण पंधरा लाख फुटबॉल वाटप करण्यासाठी पाठविले आहेत. यासह ट्रेन द  ट्रेनर हा विशेष कार्यक्रम ही पुण्यातील बालेवाडी मध्ये गुरुवारी सकाळी मालोजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आहे.

Web Title: kolhapur four player name in santosh trophy state team