कोल्हापूर : तोलाईदारांच्या संपामुळे चार कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:54 AM2018-12-13T10:54:25+5:302018-12-13T11:00:18+5:30

कोल्हापूर : इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मोजमाप केलेल्या मालाची तोलाई शेतकऱ्यांकडून घेता येणार नाही, असा आदेश पणन विभागाकडून आला आहे. या ...

Kolhapur: Four million traffic turnaround due to collision of collared workers | कोल्हापूर : तोलाईदारांच्या संपामुळे चार कोटींची उलाढाल ठप्प

शेतकऱ्यांच्या पट्टीतून तोलाई घेऊ नये, असा निर्णय पणन मंडळाने घेतल्याने त्याला विरोध करण्यासाठी कोल्हापूर बाजार समितीमधील तोलाईदारांनी काम बंद आंदोलन केले. हा निर्णय मागे घेण्याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. यावेळी बाबूराव खोत, आकाराम केसरे, अजित पाटील, आदी उपस्थित होते. (छाया- नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देतोलाईदारांच्या संपामुळे चार कोटींची उलाढाल ठप्पइलेक्ट्रॉनिक वजनकाट्यच्या तोलाईचा प्रश्न निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मोजमाप केलेल्या मालाची तोलाई शेतकऱ्यांकडून घेता येणार नाही, असा आदेश पणन विभागाकडून आला आहे. या विरोधात कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील तोलाईदारांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे कांदा-बटाटा, गुळासह इतर बाजारातील सुमारे चार कोटींची उलाढाल ठप्प झाली.

बाजार समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याची सक्ती २०१४ ला तत्कालीन पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी केली होती. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मोजमाप केलेल्या शेतीमालाची तोलाई, अडत व हमाली शेतकऱ्यांच्या पट्टीतून घेऊ नये, असा आदेशही त्यांनी काढला होता. त्याला विरोध झाल्यानंतर तत्कालीन सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘अडत बंद’चा निर्णय कायम ठेवत हमाली व तोलाईच्या निर्णयास स्थगिती दिली.

 तोलाईदारांनी काम बंद आंदोलन केल्याने बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये अशी सामसूम होती. (छाया- नसीर अत्तार)
 

गेली चार वर्षे त्याबाबत काहीच हालचाली नव्हत्या; पण पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थगिती उठविल्याची चर्चा पणन मंडळाच्या पातळीवर सुरू असल्याने तोलाईदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

या निर्णयाविरोधात तोलाईदार महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा देत काम बंद केले. बाजार समितीमधील सर्वच विभागांचे कामकाज होऊ न शकल्याने सुमारे चार कोटींची उलाढाल ठप्प झाली.

युनियनच्या वतीने बाजार समितीचे सभापती बाबासो लाड व सचिव मोहन सालपे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व आमदार अमल महाडिक यांना निवेदन देऊन हा अन्यायी निर्णय घेऊ नका, अशी विनंती केली.

यावेळी बाजार समितीचे संचालक बाबूराव खोत, युनियनचे उपाध्यक्ष आकाराम केसरे, अजित पाटील, बाजीराव लव्हटे, संजय सावंत, सरदार चव्हाण, अमित शिंगे, आदी उपस्थित होते.

 

बाजार समित्यांचे बहुतांश कामकाज इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावरच होते. शेतकऱ्यांकडून तोलाई घ्यायची नसेल तर सरकारने तोलाईदारांना बाजार समित्यांच्या सेवेत घ्यावे.
- बाबूराव खोत,
संचालक, बाजार समिती



 

 

Web Title: Kolhapur: Four million traffic turnaround due to collision of collared workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.