शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर  : माजी खासदार निवेदिता माने शिवसेनेच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 16:27 IST

माने गटाला रिचार्ज करण्याकरिता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मातोश्री व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा, माजी खासदार निवेदिता माने याही आता निवडक कार्यकर्तेसह मुंबई येथे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत, उद्या दि. 15 रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

ठळक मुद्देमाजी खासदार निवेदिता माने शिवसेनेच्या वाटेवरनिवडक कार्यकर्तेसह उद्या मुंबई येथे प्रवेश

अभय व्हनवाडे

रूकडी/ कोल्हापूर  :  माने गटाला रिचार्ज करण्याकरिता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मातोश्री व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा, माजी खासदार निवेदिता माने याही आता निवडक कार्यकर्त्यांसह मुंबई येथे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत, उद्या दि. 15 रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हातकणंगले लोकसभा मतदार संघ हा माने गटाचा पारंपारिक मतदार संघ असताना येथे सातत्याने माने गटाला डावलण्यात येत असल्याने माने गट शिवसेनेचा मार्गावर आहे. गत लोकसभा निवडणूकीत धैर्यशील माने यांना राष्ट्रवादीच्या गोटातून विधानपरिषद सदस्यपद देण्याचा शब्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला होता, पण आमदारकी तर राहूदेच पक्षांतर्गत माने गटाचे गळचेपी करण्यात आली.

त्यातच माजी खासदार निवेदिता माने यांच्या स्नुषा वेदतिंका माने यांना खुद्द घरचे मैदान असलेला रूकडी जिल्हा परिषद मतदार संघात पराभव स्विकारावा लागला होता. हा पराभव करण्याकरिता जिल्हातील एका बडय़ा नेत्याने जोरदार फिल्डींग ही लावल्याची चर्चाही होती, याचाही राग माने गटांस होता.

राष्ट्रवादीत माने गटाला अंतर्गत कलह ; व त्यातच आघाडी अंतर्गत हातकणंगले हा लोकसभेचा मतदार संघ राष्ट्रवादीचा असताना तो मतदार संघ खासदार राजू शेट्टीकरिता सोडण्यात येणार असल्याने माने गटाची अस्वस्थता वाढली होती.

शेट्टी व माने गट हे पांरपारिक राजकीय विरोधक असलयाने व शेट्टीशी राष्ट्रवादीशी सोयरीक असल्याच्या नाराजीतून माजी जि.प. उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्या पाठोपाठ आता माजी खासदार निवेदिता माने याही शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर