शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापूर : शालिनी सिनेटोनसाठी कोल्हापुरात ‘चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन’ ‘काळा दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 10:56 AM

शालिनी सिनेटोनची जागा बिल्डरच्या ताब्यात गेल्याचे जाहीर झाल्याने चित्रपट व्यावसाय आणि कोल्हापूरचे वातावरण ढवळून निघाले. जागा वाचवण्यासाठी चित्रपट महामंडळाने जनआदंोलन जाहीर केले असून त्याचा पहिला दिवस म्हणून शनिवारी साजरा होणारा चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन हा काळा दिवस पाळण्यात आला.

ठळक मुद्देशालिनी सिनेटोनसाठी ‘काळा दिन’जनआंदोलन उभारणार  : मेघराज राजेभोसले

कोल्हापूर : महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व शासन म्हणून काम करणाऱ्या मंत्र्यांनी शालिनी सिनेटोनची जागा धोक्याने बिल्डरच्या घशात घातली आहे. त्यांच्या या नतद्रष्ट कारभारामुळे आज दुर्देवाने आम्हाला चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन हा काळा दिवस म्हणून पाळावा लागतोय. पण काहिही झालं तरी आम्ही ही जागा वाचवूच असा निर्धार शनिवारी चित्रपट व्यावसायिकांनी केला. या आंदोलनात कलासक्त कोल्हापूरच्या जनतेने साथ द्यावी असे आवाहनही करण्यात आले. कलामहर्षि बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली तो १ डिसेंबर हा दिवस कोल्हापूरचा चत्रपट व्यवसाय वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र गेल्या चार दिवसात झालेल्या घडामोडीत शालिनी सिनेटोनची जागा बिल्डरच्या ताब्यात गेल्याचे जाहीर झाल्याने चित्रपट व्यावसाय आणि कोल्हापूरचे वातावरण ढवळून निघाले. जागा वाचवण्यासाठी चित्रपट महामंडळाने जनआदंोलन जाहीर केले असून त्याचा पहिला दिवस म्हणून शनिवारी साजरा होणारा चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन हा काळा दिवस पाळण्यात आला.

सकाळी १० वाजता खरी कॉर्नर येथील कॅमेरास्तंभासमोर चित्रपट व्यावसायिक एकत्र आले. सर्वांनी काळ््या फिती लावून महापालिकेचे अधिकारी व शासनाचा निषेध केला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. आज काळा दिन पाळून संबंधित यंत्रणेचा निषेध नोंदवला आहे. सोमवारी (दि. ३) महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना घेराव घालणार आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे.'' यावेळी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासह बिल्डर व महापालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजीत जाधव, सुभाष भुरके, दिग्दर्शक यशवंत भालकर, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, मिलिंद अष्टेकर, शरद चव्हाण, सतीश बीडकर, सतीश रणदिवे, अर्जुन नलवडे, चंद्रकांत जोशी, श्रीकांत डिग्रजकर, विजयमाला पेंटर, सुरेखा शहा, शुभांगी साळोखे, हेमसुवर्णा मिरजकर, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, अमर मोरे, अरुण चोपदार  यांच्यासह चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते. 

पालकमंत्र्यांना भेटणार मेघराज भोसले म्हणाले, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपील मंजूर केले असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते रद्द करू शकतात. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी  रविवारी चित्रपट व्यावसायिक पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या चर्चेतूनही काही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास न्यायालयीन लढाई करू. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर