शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

कोल्हापूर : महाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरा, प्राध्यापकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 5:22 PM

‘महाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरा’, ‘ सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा देत प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी निदर्शने केली.

ठळक मुद्देमहाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरा, प्राध्यापकांची मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे निदर्शने

कोल्हापूर : ‘महाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरा’, ‘ सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा देत प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी निदर्शने केली. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)च्या नेतृत्वाखाली त्यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर हे आंदोलन केले.महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एम्फुक्टो) विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. २ जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनातील एक टप्पा म्हणून कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या ठिकाणी प्राध्यापकांनी ‘सातव्या वेतन आयोग लागू करा’, ‘७१ दिवसांचा पगार मिळालाच पाहिजे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.|त्यानंतर झालेल्या सभेत ‘सुटा’चे अध्यक्ष डॉ. आर. एच. पाटील, कोल्हापूरचे सहकार्यवाह प्रा. सुभाष जाधव यांनी मार्गदर्शन केले. विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण सहसंचालक कार्यालयातील प्रशासनाधिकारी डी. पी. माने यांना दिले. या आंदोलनात ‘सुटा’चे सुधाकर मानकर, आर. जी. कोरबू, प्रकाश कुंभार, टी. व्ही. स्वामी, डी. एन. पाटील, अरुण पाटील, ए. बी. पाटील, यू. ए. वाघमारे, इला जोगी, आर. के. चव्हाण, युवराज पाटील, एस. एम. पवार, आदींसह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील प्राध्यापक सहभागी झाले.

प्रलंबित मागण्या

  1.  राज्य शासनाने नोकरभरतीवरील बंदी त्वरित उठवावी.
  2. यूजीसीच्या नियमांप्रमाणे सर्व शिक्षकांना त्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून द्यावे.
  3.  उच्च शिक्षण संचालक, सहसंचालकांच्या कार्यालयीन कार्यप्रणालीतील एकाधिकारशाही संपुष्टात आणावी.
  4. सीएचबीधारक प्राध्यापकांना नियमित वेतन मिळालेच पाहिजे.

 

पुणे येथे राज्यव्यापी निदर्शनेराज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित कायमस्वरूपी भराव्यात. सन २०१३ मध्ये परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार कालावधीतील रोखलेले वेतन त्वरित अदा करावे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी. जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘एम्फुक्टो’तर्फे टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन केले जाणार आहे. त्याअंतर्गत निदर्शने करण्यात आली. यानंतर दि. २७ आॅगस्टला पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयासमोर राज्यव्यापी निदर्शने केली जाणार आहेत, अशी माहिती प्रा. जाधव यांनी दिली.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर