शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील बनावट नोटा प्रकरण: खपवलेल्या नोटा शोधण्याचे आव्हान, संशयितांच्या घरांची झडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 13:51 IST

संशयितांच्या घरांमधून काही कागदपत्रे, बँकांचे पासबुक जप्त. त्याशिवाय विशेष वस्तू किंवा माहिती पोलिसांच्या हाती लागली

कोल्हापूर : बनावट नोटा छापून त्या खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील दोन संशयितांच्या घरांची झडती कळे पोलिसांनी सोमवारी (दि. २३) घेतली. तसेच बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेल्या प्रिंटरच्या खरेदीचा पंचनामा कोल्हापुरातील शाहूपुरीच्या तिसऱ्या गल्लीतील किशन फोटो प्लाझामध्ये करण्यात आला. संशयितांनी बाजारात खपवलेल्या बनावट नोटा शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. २०) बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्या गुन्ह्याचा पुढील तपास कळे पोलिसांकडून सुरू असून, सोमवारी संदीप बाळू कांबळे (वय ३८, रा. कळे, ता. पन्हाळा) आणि अभिजित राजेंद्र पवार (वय ४०, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) या दोघांच्या घरांची झडती घेतली. दोन्ही संशयितांच्या घरांमधून काही कागदपत्रे, बँकांचे पासबुक जप्त करण्यात आले. त्याशिवाय विशेष वस्तू किंवा माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही.संशयितांनी नोटा छापण्यासाठी कोल्हापुरातील शाहूपुरी येथील किशन फोटो प्लाझामधून प्रिंटरची खरेदी केली होती. १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांवरील महात्मा गांधीजींच्या फोटोचे डिझाईन याच ठिकाणाहून तयार करून घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी संशयितांच्या उपस्थितीत प्रिंटर खरेदीचा पंचनामा करून किशन फोटो प्लाझामधील विक्रेत्याचा जबाब नोंदवला, अशी माहिती कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी दिली.बनावट नोटा खपवल्याची कबुलीअटकेतील चार संशयितांपैकी संदीप कांबळे याने काही बनावट नोटा खपवल्याची कबुली दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३० हजार रुपयांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या नोटा दिल्याची चर्चा आहे, मात्र त्याचे ठोस पुरावे नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बाजारात खपवलेल्या नोटा शोधण्याचेही आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. बनावट नोटांवरील नंबरची माहिती जाहीर करून या नोटांचा वापर थांबवावा, असे आवाहन करण्याचा पर्याय असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस