शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीतून चार आरोपींचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 11:37 IST

शाहूवाडी पोलिस ठाण्यातून चार अट्टल आरोपी शुक्रवारी पहाटे कोठडीचे लॉकअप तोडून पळून गेले. या आरोपींवर दरोडा, घरफोडीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी केली असून पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी शोधपथके रवाना केली आहेत.

ठळक मुद्देशाहूवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीतून चार आरोपींचे पलायनपोलिसांनी तत्काळ नाकेबंदी केली, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

कोल्हापूर : शाहूवाडी पोलिस ठाण्यातून चार अट्टल आरोपी शुक्रवारी पहाटे कोठडीचे लॉकअप तोडून पळून गेले. या आरोपींवर दरोडा, घरफोडीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी केली असून पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.दरोडा आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असलेले सूरज सर्जेराव डबडे (वय २२, रा. वाठार पैकी कासारवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), ओंकार महेश सूर्यवंशी (वय १९, रा. बँक आॅफ इंडियासमोर, कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली), गोविंद वसंत माळी (वय १९, रा. यशवंततनगर कॉलनी, कासेगाव, जि. सांगली) आणि विराज गणेश कारंडे (वय १९, रा. पाडळी दरवेज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे चार आरोपी शाहूवाडी पोलिस ठाण्यात २0 मे पर्यंत रिमांडवर पोलिस कोठडीत होते.

या आरोपींवर शाहूवाडी पोलिस ठाण्यात ३/२0१८ कलम ४५४, ४५७ आणि ३८0 नुसार गुन्हा दाखल असून त्यांना या पोलिस ठाण्यात रिमांडवर पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे ४ ते ५ या वेळेत या चारही आरोपींनी शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीच्या लॉकअपच्या दरवाजाचे ग्रील वाकवून पळून गेले.

हे आरोपी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले होते. शाहूवाडी तालुक्यातील घरफोडीच्या तपासासाठी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातून चार दिवसा पूर्वी म्हणजे दि. १६ मे रोजी या आरोपींचा ताबा शाहूवाडी पोलिसांनी ताबा घेतला होता. शाहूवाडी न्यायालयाने या आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यांची कोठडीची मुदत २0 मे रोजी संपणार होती.

पोलिस कोठडीतून चार आरोपी पळून गेल्याचे समजताच शाहूवाडी पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली असून त्यांच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. पोलिस निरिक्षक अनिल गाडे, पोलिस नाईक सराटे, पोलिस शिपाई मोळके, तसेच कोल्हापूर नियंत्रण कक्षातून अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हाPoliceपोलिस