शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

कोल्हापूर : सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:43 AM

देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणीमहाराष्ट्रातील ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी

कोल्हापूर : देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयात या योजनेंतर्गत सर्वात जास्त ४५५ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे, या जिल्हयात एकूण ७ खेडयात वीज जोडणी देण्यात आली. तसेच सातारा जिल्हयातील एका खेडयात ६५  या सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे.

आतापर्यंत देशातील १६ हजार ८५० खेडयांना मोफत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील १९२ खेडयांचा यात समावेश असून ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्यावतीने व केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या मदतीने देशातील वीज जोडणीपासून वंचित असलेल्या गोर-गरीब जनतेला वीज जोडणी देण्यासाठी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजना सप्टेंबर २०१७ मध्ये सुरु करण्यात आली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उदघाटन करण्यात आले. या योजनेनुसार देशातील प्रत्येक खेडयाला मार्च २०१९ पर्यंत वीज जोडणी देण्याचे उदिष्टय ठेवण्यात आले असून गेल्या ७ महिन्यांपासून आजपर्यंत देशभरातील २७ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील १६ हजार ८५० खेडयांना वीज जोडणी देण्यात आली आहे, ज्याद्वारे ५ लाख १९ हजार ३५८ घरांना जोडणीचा लाभा मिळाला आहे.विदर्भातील ५ हजार २३७ घरांना वीज जोडणीसौभाग्य योजना सुरु झाल्यापासून राज्यातील एकूण २३ जिल्हयांतील १९२ खेडयांना या योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे. यानुसार विदर्भातील सर्वच ११ जिल्हयांतील १४० खेडयांतील ५ हजार २३७ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. मराठवाडयातील ८ जिल्हयातील ४२ खेडयांतील २ हजार९३८ घरांना, पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हयातील ९ खेडयांतील ५४२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आणि खान्देशातील १०३ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.सौभाग्य योजनेंतर्गत विदर्भात सर्वात जास्त गडचिरोलीजिल्हयात वीज जोडणी देण्यात आल्या. गडचिरोली जिल्हयातील ८ खेडयांतील ११५९ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. यासोबत अकोला जिल्हयातील ३४ खेडयांमधील ४१० घरांना, अमरावती जिल्हयातील २५ खेडयांमधील ७३५ घरांना, भंडारा जिल्हयातील ७ खेडयांतील २४४ घरांना, बुलडाणा जिल्हयातील २२ खेडयांतील ५६५ घरांना,चंद्रपूर जिल्हयातील ७ खेडयांतील ७४४ घरांना, नागपूर जिल्हयातील ४ खेडयांतील १०२ घरांना, गोदिंया जिल्हयातील ३ खेडयांतील ५९ घरांना, वाशिम जिल्हयातील १५ खेडयांतील ४२६ घरांना, यवतमाळ जिल्हयातील १३ खेडयांतील ७८८ घरांना, वर्धा जिल्हयातील २ खेडयांतील ५ घरांना सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यातआली आहे.मराठवाडयातील २ हजार ९३८ घरांना वीज जोडणीया योजनेंतर्गत मराठवाडा विभागात नांदेड जिल्हयात सर्वात जास्त १२१७ घरात वीज जोडणी देण्यात आली या जिल्हयातील २० खेडयांमध्ये ही जोडणी देण्यात आली. अहमदनगर जिल्हयातील ३ खेडयांमधील ४०४ घरांना, औरंगाबाद जिल्हयातील एका खेडयातील ७२ घरांना, बीड जिल्हयातील ३ खेडयांतील १५७ घरांना, हिंगोली जिल्हयातील ५ खेडयांतील ४८० घरांना, लातूर जिल्हयातील ७ खेडयांतील ३४९ घरांना, उस्मानाबाद जिल्हयातील २ खेडयांतील ७८ घरांना आणि जालना जिल्हयातील एका खेडयातील १८१ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.खान्देशातील जळगाव जिल्हयातील एका खेडयामध्ये या योजनेंतर्गत १०३ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर