शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : उर्दू शाळेतील शिक्षकांना कायम करण्यासाठी प्रयत्नशील : महापौर यवलुजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 13:20 IST

उर्दू शाळेतील शिक्षकांना कायम करण्याचा प्रश्न प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहे. याची माहिती घेऊन या शिक्षकांना कायम करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन महापौर स्वाती यवलुजे यांनी दिले.

ठळक मुद्दे उर्दू शाळेतील शिक्षकांना कायम करण्यासाठी प्रयत्नशीलमहापौर यवलुजे यांचे आश्वासनशिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशन

कोल्हापूर : उर्दू शाळेतील शिक्षकांना कायम करण्याचा प्रश्न प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहे. याची माहिती घेऊन या शिक्षकांना कायम करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन महापौर स्वाती यवलुजे यांनी दिले.बेलबाग येथील अजिंक्यदत्त हॉलमध्ये गुरुवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोल्हापूर शहर शाखेच्या त्रैवार्षिक अधिवेशनात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे होते. शिक्षण सभापती वनिता देठे, शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदयराव शिंदे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रभाकर आरडे म्हणाले, शहरामध्ये सर्वच शाळांना समान वागणूक मिळाली पाहिजे. मराठी शाळांना एक आणि उर्दू शाळांना दुसरी वागणूक असे होता कामा नये; म्हणूनच या उर्दू शाळांमधील शिक्षकांना कायम केले पाहिजे. शिक्षण क्षेत्रात कधी नव्हे एवढे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे याविरोधात जनआंदोलन उभे करणे गरजेचे आहे.शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदयराव शिंदे म्हणाले, अशैक्षणिक कामाला शिक्षकांना पुन्हा जुंपले जात आहे. राज्यकर्त्यांची शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची मानसिकताच दिसत नाही.याप्रसंगी शिक्षक नेते दिलीपराव भोईटे, अर्जुन पाटील, प्रमोद तौंदकर, सुधाकर सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. उमेश देसाई यांनी प्रास्ताविक, तर जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी आभार मानले. आदर्श शिक्षकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यांच्यासह शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अधिवेशनात करण्यात आलेल्या मागण्यास्थानिक स्तर१. उर्दूच्या शिक्षण सेवकांना ताबडतोब कायम करून त्यांचा फरकासह पगार आदा करावा.२. वरिष्ठ श्रेणीची प्रकरणे तातडीने निकालात काढावीत.३. कलाशिक्षकांना वरिष्ठ श्रेणी लागू करावी.४. सेवानिवृत्तीसह कार्यरत शिक्षकांना निवड श्रेणी लागू करावी.५. बदल्यांपूर्वी पदोन्नती द्यावी. प्रभारी मुख्याध्यापकांना नियमित मुख्याध्यापकांचे आदेश द्यावेत. विषयशिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात.राज्य स्तर१. नगरपालिका, महानगरपालिका यांना १०० टक्के वेतन अनुदान द्यावे.२. नगरपालिका, महानगरपालिकेकडील शिक्षकांना गटविमा लागू करावा.३. महाराष्ट्रातील एकही शाळा बंद करण्यात येऊ नये.४. जुनी पेन्शन योजना लागू करावी.५. शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवावी.

 

टॅग्स :Schoolशाळाkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका