शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांची विशीष्ट समाजात वाटणी नको : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 18:35 IST

थोर राष्ट्रपुरुषांची विशीष्ट समाजात वाटणी करु नका, ते सर्वधर्माचे असून त्याच्या शिकवणी आजच्या पिढीने आचरणात आणावे, त्यांच्या जयंती एकोप्याने व लोकोत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी शांतता समितीच्या बैठकीत केले. सोशल मिडीया व डिजीटल फलकावरुन जातीय तेढे, इर्ष्या निर्माण करुन वातावरण दुषीत करणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशाही सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

ठळक मुद्देराष्ट्रपुरुषांची विशीष्ट समाजात वाटणी नको : जिल्हाधिकारी जयंती एकोप्याने, लोकोत्सव म्हणून साजरा कराजातीय तेढे निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा

कोल्हापूर : थोर राष्ट्रपुरुषांची विशीष्ट समाजात वाटणी करु नका, ते सर्वधर्माचे असून त्याच्या शिकवणी आजच्या पिढीने आचरणात आणावे, त्यांच्या जयंती एकोप्याने व लोकोत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी शांतता समितीच्या बैठकीत केले. सोशल मिडीया व डिजीटल फलकावरुन जातीय तेढे, इर्ष्या निर्माण करुन वातावरण दुषीत करणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशाही सुचना त्यांनी यावेळी दिल्या.शनिवारी (दि.१४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुधवारी (दि. १८) शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात शांतता प्रस्तापित रहावी या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस मुख्यालयात या शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सुभेदार यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी महापौर स्वाती यवलूजे, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, आमदार राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर आदी प्रमुख उपस्थित होते.थोर राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या ह्या लोकोत्सव म्हणून सर्वांनी एकत्र येऊन साजऱ्या केल्या पाहिजेत या राष्ट्रपुरुषांनी प्रज्ञा, शांतताची शिकवण दिली आहे. छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जातीपातीचे राजकारण न करता सलोखा राखण्याचे आवाहन केले होते, त्याची शिकवण आजच्या युवा पिढीला देणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी व्यक्त केले.पोलीस अधीक्षक संजय मोहिते म्हणाले, सोशल मिडीयाच्या माध्यमातून देशाच्या कोपऱ्यात घडलेल्या घटनेचे पडसाद आपल्या जिल्ह्यात उमटतात हे दुदैर्व आहे. व्हॉटस् अपचा दुरुपयोग तणाव निर्माण करणारा, भावना भडकवणारा ठरत आहे.

चुकीचे संदेश जाणून-बुजून पसरवले जात आहेत. डिजीटल फलकांमुळे समाजात तेढे निर्माण करण्याचे काम जाणिवपूर्वक केले जात आहे. पोलिस हुल्लडबाजावर कारवाई करु शकतात, पण मुलांच्या आंंनदासाठी हुल्लडबाजाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. त्यामुळे सर्व सण, उत्सव एकोप्याने व शांततेने साजरे करुया असेही आवाहन करण्यात आले.हातात हात घालून सण साजरे करुया : क्षीरसागरकोल्हापूरच्या शाहू नगरीत हातात हात घालून सर्वांनी काम करुया. थोरांचे विचार आत्मसात केल्यास भविष्यात दंगली घडणार नाहीत असे सांगून आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, सण व जयंतीवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार मर्यादीत आवाजात साऊंड सिस्टीमला परवानगी देण्याबाबत विचार व्हावा. चुकलेल्यांना नेत्यांनी अथवा पोलिसांनीच पाठीशी न घातल्यास भविष्यात अप्रीय घटना घडणार नाहीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जाती-पातीच्या भींती गाडा: महेश जाधवहुल्लडबाजा कोण आहेत हे पोलिसांना माहिती आहे, त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे असे सांगून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, सामाजिक कार्यक्रमात राजकारण आणू नये, समाजात जाती-पातीच्या उभारणाऱ्या भींती रोखण्यासाठी थोराच्या विचाराच्या जनजागृतीची गरज आहे. काहीजण साऊंड सिस्टीमचा मुद्दा पुढे करुन राजकारण आणू पहातात. पण उत्सवात २ टॉप व २ बेस लावण्यास परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आली.हद्दपारीच्या नोटीसा मागे घ्या: उत्तम कांबळेपक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वता:शीच अचारसंहिता घालून द्यावी. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कधीही हुल्लडबाजी करत नाहीत त्यामुळे कोल्हापूर बंदवेळी ज्यांनी दंगल घडविली ती समाजकंटक होती, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नव्हते. त्यामुळे पोलिसांनी दलीत समाजातील कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या काढलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात असे आवाहन उत्तम कांबळे यांनी केले.यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत, मुस्लीम बोडींंगचे चेअरमन गणी अजरेकर, स्याथी समितची माजी सभापती आदील फरास, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, रिपई (गवई गट) जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख, दिलीप देसाई, दगडू कांबळे, अ‍ॅड. पंडीतराव सडोलीकर, बाळासाहेब भोसले आदींनी सुचना मांडल्या. 

 

टॅग्स :collectorतहसीलदारkolhapurकोल्हापूर