शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसवर सतेज पाटील गटाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 14:37 IST

काँग्रेस पक्षांतर्गत झालेल्या युवक काँग्रेस पदाधिकारी निवडीवर आमदार सतेज पाटील गटाचे वर्र्चस्व राहिले आहे. गुरुवारी दुपारी या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद कांबळे, तर उपाध्यक्षपदी बयाजी शेळके आणि ऐश्वर्या भाट या विजयी झाल्या आहेत. निवडीनंतर काँग्रेस कमिटीच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसवर सतेज पाटील गटाचे वर्चस्वजिल्हाध्यक्षपदी दयानंद कांबळे, दीपक थोरात पुन्हा शहराध्यक्ष

कोल्हापूर : काँग्रेस पक्षांतर्गत झालेल्या युवक काँग्रेस पदाधिकारी निवडीवर आमदार सतेज पाटील गटाचे वर्र्चस्व राहिले आहे. गुरुवारी दुपारी या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद कांबळे, तर उपाध्यक्षपदी बयाजी शेळके आणि ऐश्वर्या भाट या विजयी झाल्या आहेत. निवडीनंतर काँग्रेस कमिटीच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

दयानंद कांबळेयुवक काँग्रेस पदाधिकारी निवडीसाठी १२ तारखेला ३ टप्प्यांत मतदान घेण्यात आले होते. गुरुवारी दुपारी मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर करण्यात आला. यंदा जिल्हाध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. या पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये दयानंद कांबळे यांनी बाजी मारली.

दीपक थोरातकांबळे हे गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वर गावचे आहेत. उपाध्यक्ष बयाजी शेळके यांचे गाव गगनबावडा तालुक्यातील वेसरफ असून त्यांनी असळफचे सरपंच म्हणूनही याआधी काम पाहिले आहे. भाट या राधानगरी तालुक्यातील आहेत.

 बयाजी शेळकेजिल्हा सरचिटणीस पदासाठी झालेल्या निवडणुकीत दिग्विजय देसाई, गणेश आडनाईक, अनिस म्हाळदार, महादेव कांबळे, नितीन बागे, नौशाद बुढेखान, विशाखा कुऱ्हाडे, विश्वजित हप्पे यांनी विजय मिळविला. कोल्हापूर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी दीपक थोरात यांनी पुन्हा बाजी मारली आहे. थोरात हे पीटीएमचे फुटबॉल खेळाडू असून याआधीही त्यांनी या पदावर काम केले आहे.

 स्वप्निल सावंतयावेळी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय अध्यक्ष निवडण्यात आले आहेत. यामध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सचिन रावळ, उत्तर विधानसभा-स्वप्निल सावंत, करवीर- सचिन चौगुले, शाहूवाडी-ओंकार सुतार, कागल- मयुर डेळेकर, चंदगड- प्रदीप पाटील, राधानगरी- वैभवराज तहसीलदार, शिरोळ- फैसल पटेल हे विजयी झाले. निकालावेळी जिल्ह्यातील युवक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयास भेट दिली.

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर